सप्टेंबर महिना कोरोना ब्लास्टचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:46+5:30

जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता.

Of the September Corona Blast | सप्टेंबर महिना कोरोना ब्लास्टचा

सप्टेंबर महिना कोरोना ब्लास्टचा

Next
ठळक मुद्दे९ दिवसात १७ बाधितांचा मृत्यू : १११८ कोरोना बाधित, शहराला विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव वाढत असून शहरी भागात वेगाने संसर्ग होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. १ ते ९ सप्टेंबर दरम्यान १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मागील सहा महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर १११८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना एकही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. तर मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत २८८ कोरोना बाधित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिना कोरोना उद्रेकाचा ठरला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात दररोज शंभर कोरोना बाधितांची भर पडत असून १ ते ९ सप्टेंबर दरम्यान १११८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग चौपट झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया शहरात आढळले असून रुग्ण संख्या दीड हजारावर गेली आहे.
त्यामुळे संपूर्ण गोंदिया शहरच कोरोनाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरवासीयांना वेळीच सावध होण्याची गरज असून आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत:ची आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेण्याची गरज आहे.

दर १४ तासाला एका बाधिताचा मृत्यू
कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतकांच्या संख्येत सुध्दा झपाट्याने वाढ होत आहे. नऊ दिवसात १७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून दर १४ तासाला एका कोरोना बाधिताचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.

मेडिकलचा दुर्लक्षितपणा भोवतोय
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी नागरिक मेडिकलमध्ये जात आहे. मात्र या ठिकाणी स्वॅब नमुने कुठे घेतले जातात, या केंद्राकडे जाण्याचा मार्ग कोणता यासंबंधी कुठलेच माहिती फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे तपासणीसाठी जाणाऱ्या अर्धा तास चाचपडत राहावे लागते. तर स्वॅब नमुने तपासणीठी या केंद्रासमोर रांग लागत असून यात अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण सुध्दा असतात. त्यामुळे सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पण याकडे मेडिकलच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे.
कर्मचाऱ्यांअभावी केवळ दोन तास तपासणी
४कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मेडिकलचा अनागोंदी कारभार सुध्दा पुढे येत आहे. मनुष्य बळाचा अभाव असल्याने मेडिकलच्या स्वॅब नमुने तपासणी केंद्रात केवळ दोन तास स्वॅब नमुने घेतले जात असल्याची माहिती आहे. स्वॅब नमुने घेणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. परिणामी तपासणीसाठी येणाºया अनेकांना आल्या पावलीच परत जावे लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Of the September Corona Blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.