महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:02 PM2018-03-29T21:02:47+5:302018-03-29T21:02:47+5:30
श्री सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरूवारी (दि.२९) करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : श्री सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरूवारी (दि.२९) करण्यात आली.
या महोत्सवातंर्गत माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात बुलेट जयघोष रॅली काढण्यात आली व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर रॅलीत भगवान महावीर यांचा जयघोष, जगा आणि जगू द्या, गौरक्षा व इंडिया नही भारत असा जयघोष करण्यात आला.
गोरेलाल चौकातील दिगंबर जैन मंदिरातून प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर शोभायात्रा काढून श्री टॉकिज चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा चौक, जैन कुशल भवन, जुने बस स्टॅन्ड, चांदनी चौक, दुर्गा चौकातून पुन्हा गोरेलाल चौक व दिगंबर जैन मंदिरात समाप्त झाली.
शोभायात्रेत सुंदर देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी महिलासुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर भगवान महावीर यांचा समाजबांधवांच्या उपस्थितीत महाषिभेक करण्यात आला.
आनंदोत्सवासाठी अन्नी जैन व बुलेट रॅलीसाठी संदीप जैन, सौरभ जैन, नवीन जैन, संकल्प जैन, निखिल जैन, आशिक पांड्या यांनी सहकार्य केले. सहकार्यासाठी संयोजक राजेश जैन यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी माजी आ. राजेंद्र जैन, राजकुमार एन. जैन, राजेश जैन, संजय चोपडा, बिपिन बाविसी, नवीन जैन, संदीप जैन, सुधीर जैन, सुनील जैन, अक्षय जैन, अशोक ठोल्या, प्रकाश कोठारी, सुभाष बोथरा, दिनेश बैद, प्रकाश खजांची, नवरतन चोपडा, पंकज चोपडा, संजय जैन, सुकमाल जैन, सुधीर जैन आदींनी सहकार्य केले.