चार गावांसाठी तोडगा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:53 PM2017-12-12T22:53:40+5:302017-12-12T22:53:58+5:30
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत.
आॅनलाईन लोकमत
काचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत. यासाठी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात सोमवारी कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान दोन्ही राज्यांच्या संबंधित जिल्हाधिकाºयांशी बोलून त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.
दिलीप बंसोड यांच्या नेतृत्वात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, कृष्णा भांडारकर, मुन्ना पटले, मध्यप्रदेशचे अजाब शास्त्री, उपसरपंच झनकार कडाऊ, राजेंद्र वानखेडे, दुर्योधन कोडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांची भेट घेण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी पंकज गेडाम, कनिष्ठ अभियंता एन.व्ही. अहिरराव उपस्थित होते.
भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या चार गावांचे अंदाजे ९०० च्यावर शेतकरी धापेवाडा डॅमचे पाणी बॅक स्टोरेजमुळे ठप्प झाल्याने शेतात जावू शकत नाही. परिणामी एक महिन्यापासून धान कापणी करण्यात आली. पण शेतात कोणतेही साधन जात नसल्याने सर्व धान पीक शिवारात पडून आहे. शेतातील धानाची नासाडी होत असून काही दिवसांनी एक दानाही हाती लागणे कठीण आहे, असे कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांना सांगण्यात आले.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा येथील पाणी पिण्याकरिता उपयोगात यावे किंवा पिण्याच्या पाण्याची पातळी टिकून राहावी, याकरिता प्रकल्पात पाणी स्टोरेज केले जात आहे.
याचा दुष्परिणामामुळे चारही गावांच्या शेतकºयांना नदी ओलांडून जाता येत नाही. नदीला लागून असलेल्या नाल्यांना थोप असल्यामुळे शेती संबंधित साधन व लोकांना जाणे कठीण झाले आहे.
या वेळी माजी आ. बंसोड यांनी, धापेवाडा प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचा स्टोरेज करण्यापूर्वी भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या गावांच्या ग्रामपंचायतींना सूचना देणे गरजेचे होते. असे बोलून महाराष्ट्र राज्यात पाण्याची टंचाई भागविण्याकरिता दुसºया राज्याच्या जनतेवर अन्याय करु शकत नाही. तातडीने उपाययोजना करा. दोन्ही राज्याच्या संबंधित जिल्हाधिकाºयांना विश्वासात घेवून तत्काळ व्यवस्था करायला सांगा किंवा आपण स्वत: करा, असे बजावून सांगितले.
यावर कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांनी तत्काळ दोन्ही जिल्हाधिकाºयांना मिळून व्यवस्था कशी करता येईल, याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी बोलेश बिजेवार, राकेश चौरीवार, राजकुमार कावळे, महेश लिल्हारे, शंकर बारेवार, सोमा पगरवार, नारायण लिल्हारे, नान्हू लिल्हारे, गणपत ठवकर, लोकेश्वर कोडेश्वर, लिखीराम लिल्हारे, रविंद्र लिल्हारे, मोरेश्वर कोडेश्वर, रामेश्वर लिल्हारे, बालाराम राऊत, मनोज कोडेश्वर व नारायण कोडेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.
नदीच्या दोन्ही तिरावर मजबूत बांधकाम करण्यात यावे. तसे झाल्यास रेताळ जमिनीमुळे किनारपट्टी वाहून जाणार नाही. तसेच कायमस्वरुपी पूल तयार करण्यात यावे, अशी मागणी माजी आ. दिलीप बंसोड व अजाबराव शास्त्री यांनी कार्यकारी अभियंता फाळके यांच्याकडे केली.