राष्ट्रीय लोकअदालतीत २६४ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:10+5:30
जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी १३५१ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ ३३४१ प्रकरणांपैकी १३० प्रकरणे निकाली काढण्यात आली.असे एकूण ४ हजार ६९२ प्रकरणांपैकी २६४ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला. १ कोटी ६६ लाख ५९ हजार ६५६ रु पयांची वसुली करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबीत असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने निकाली निघावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने आणि प्राधिकरणाचे सचिव एम.बी.दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच पाणी, विद्युत, टेलिफोन व लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २६४ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.
जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी १३५१ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ ३३४१ प्रकरणांपैकी १३० प्रकरणे निकाली काढण्यात आली.असे एकूण ४ हजार ६९२ प्रकरणांपैकी २६४ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला. १ कोटी ६६ लाख ५९ हजार ६५६ रु पयांची वसुली करण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रासातून सुटका मिळाली.यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी, टेलिफोन यांचे पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधीत विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची निकाली काढण्यात आली. न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता जिल्हा न्यायाधीश-१ एस.बी.पराते व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.जी. जोशी, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जे.भट्टाचार्य, मुख्य न्यायदंडाधिकारी एन.आर.वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, जे.एम.चव्हान, सह दिवाणी न्यायाधीश आर.डी.पुनसे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व्ही.आर आसुदानी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश व्ही.आर.मालोदे, चौथे सह दिवाणी न्यायाधीश पी.सी.बछले, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश व्ही.के.पुरी, सहावे सह दिवाणी न्यायाधीश यांनी तसेच पॅनलवरील अॅड. मंगला बन्सोड, अर्चना नंदघळे, एम.पी.चतुर्वेदी, पिंकी जमरे, वैशाली उके, कौशल्या खटवाणी, नीना दुबे,सुनिता चौधरी, दर्शना रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, संगीता घोष, आर.डी.बडगे, सविता तुरकर,मोनिता राणे, निशा भुरे, आशा ठाकुर, आर.टी.बघेले, मधुकर नखाते यांनी सहकार्य केले.