डुकरांच्या समस्येवर तोडगा निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:54 AM2018-02-21T00:54:03+5:302018-02-21T00:54:42+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून शहरवासीयांत जनजागृती व शहर स्वच्छतेचे कार्य केले जात आहे.

Settlement on the issue of pigs | डुकरांच्या समस्येवर तोडगा निघेना

डुकरांच्या समस्येवर तोडगा निघेना

Next

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून शहरवासीयांत जनजागृती व शहर स्वच्छतेचे कार्य केले जात आहे. असे असताना मात्र घाणीचे वाहक म्हटल्या जाणाऱ्या डुकरांच्या समस्येवर नगर परिषदेकडे काहीच तोडगा नसल्याचे दिसते. कारण, शहरातील डुकरांची समस्या दिवसेंदिवस अधीकच गंभीर होत चालली असून शहरवासी चांगलेच त्रासले आहेत.
नगर परिषदेतील विरोधी पक्षातील सदस्यांनी उपाध्यक्षांच्या निवडीला घेऊन न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रीयेमुळे नगर परिषदेच्या कारभारावर परिणाम पडला. ही बाब लक्षात घेत न्यायालयाने जनहितार्थ विषयांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकाºयांना एका आदेशातून दिले. याच दरम्यान, नगराध्यक्षांनी २७ आॅक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. त्यात नगर परिषद क्षेत्रातील बेवारस डुकरांचा बंदोबस्त करण्याचा विषय मांडण्यात आला होता. पाच विषयांच्या या सभेत सर्वच विषयांना मंजुरी मिळाली होती.
या सभेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी टेमनी येथील जागेवर शहरातील डुकरांची व्यवस्था करण्यात येणार असे काही ठरविले होते. यात डुकर पालकांना त्यांचे डुकर तेथे हलवायचे होते व तेथेच पाळायचे असे काही ठरविण्यात आले होते. शिवाय शहरात निघणारा कचरा डुकरांना देण्याचा विचार होता. मात्र टेमनी येथील जागाच वांद्यात असल्याने मुख्याधिकाऱ्यांचा हा प्लान फसल्याचे वाटते. मात्र त्यानंतरही आता या विशेष सभेला चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना डुकरांच्या विषयावर काहीच हालचाल होत असताना दिसत नाही. परिणामी दिवसेंदिवस डुकरांची संख्या वाढतच चालली असून ही समस्या अधीकच गंभीर होताना दिसत आहे.
डुकरांची समस्या सुटत नसल्यामुळे आजघडीला शहरातील प्रत्येकच भागात डुकरांचे कळप बघावयास मिळतात. ‘बघावे तेथे डुकर’ अशी आजची स्थिती असून आतातर लोकांच्या घरात डुकर शिरू लागले असे चित्र निर्माण झाले आहे. शिवाय रस्त्याने जाताना कधी डुकर आडवे येणार याचा काही नेम नसून यातूनच कित्येकदा अपघातही घडले आहेत.
हे सर्व होत असताना नगर परिषद प्रशासनाकडून काहीच पाऊल उचलले जात नसल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. मात्र नगर परिषद कोठेतरी कमकुवत पडत असल्यामुळे डुकरांच्या समस्येवर काही तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे.
यापूर्वीही प्रयोग फसला
तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे येथे असताना त्यांनी नाशिक येथील डुकर पकडणाऱ्यांचे पथक बोलाविले होते. मात्र येथील डुकर पालकांनी त्यांच्याशी वाद घातल्याने तेही येथून परत गेले होते. ते परत गेल्याने मोरे यांनी हाती घेतलेला प्रयोग फसला होता. त्यानंतर कुणीही या विषयात हात घातला नाही. परिणामी आता एवढ्या काळात डुकरांची समस्या अधीकच गंभीर झाली आहे. नगराध्यक्षांनी विशेष सभेत डुकरांचा विषय मांडून त्याला सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. आता डुकरांच्या या गंभीर समस्येवर मुख्याधिकारी काय तोडगा काढतात हे बघायचे आहे. मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयाने अधिकार दिल्याने त्यांनीच आता काही हालचाल करावी अशी अपेक्षा शहरवासी बाळगून आहेत.

Web Title: Settlement on the issue of pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.