लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

By नरेश रहिले | Published: April 30, 2023 08:26 PM2023-04-30T20:26:04+5:302023-04-30T20:26:11+5:30

या तडजोडीमुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून यातून ४.१४ कोटींची वसुली करण्यात आली आहे.

Settlement of 10 thousand cases in Lok Adalat, parties expressed satisfaction | लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

googlenewsNext

नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि. ३०) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत १० हजार आठ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या तडजोडीमुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून यातून ४.१४ कोटींची वसुली करण्यात आली आहे.

वर्षांनुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.व्ही. पिंपळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोड पात्र न्यायप्रविष्ट व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणाकरिता विद्युत व बँक लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी.के. बडे यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी केले. त्यांनी लोकअदालतीचे फायदे व महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तडजोडीने प्रकरण निकाली काढण्याकरिता येथील जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. खान, जिल्हा न्यायाधीश- २ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन.डी. खोसे, तदर्थ न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन.बी. लवटे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) आर.एस. कानडे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.व्ही. कुलकर्णी, कामगार न्यायाधीश वाय.आर. मुक्कणवार, जिल्हा तकार निवारण आयोग अध्यक्ष बी.बी. योगी, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.आर. मोकाशी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही.ए. अवघडे, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.एन. ढाणे, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम.बी. कुडते, चाैथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाय.जे. तांबोली, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.डी. वाघमारे, सहावे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर टी.व्ही. गवई, गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी.के. बडे, उपाध्यक्ष ॲड. आरती भगत, सचिव एस.आर. बोरकर, पॅनलवरील वकील ॲड. दयाल कटीयार, शुभम रामटेके, माया उपराडे, राखी पटले, शिल्पा सोनी, रेखा खोबागडे, गोंदिया यांनी सहकार्य केले. आयोजनासाठी प्रबंधक आर.जी. बोरीकर, अधीक्षक पी.पी. पांडे, एम.पी. पटले, ए.एम. गजापुरे, सचिन एम. कठाणे, पी.एन. गजभिये, एस.डी. गेडाम, प्रीती जेंगठे, बी.डब्ल्यू. पारधी, यू.पी. शहारे, जगदिश पटले, रीना ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.

चार कोटी १४ लाखांची केली वसुली

 जिल्ह्यातील एकूण न्यायालयात प्रलंबित दिवाणी ४१४ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढून एक कोटी २३ लाख ८४ हजार ३३१ रुपये वसूल करण्यात आले. न्यायालयात प्रलंबित ८५५ फौजदारी प्रकरणांपैकी ८५५ प्रकरणे निकाली काढून एक कोटी ३९ लाख ५८ हजार १६६ रुपये वसूल करण्यात आले. पूर्वन्यायप्रविष्ट २५ हजार २९ प्रकरणांपैकी नऊ हजार ११७ प्रकरणे निकाली काढून एक कोटी ५१ लाख दाेन हजार ४९७ रुपयांची वसुली केली. एकूण ठेवलेल्या प्रकरणांपैकी १० हजार आठ प्रकरणे निकाली काढून एकूण चार कोटी १४ लाख ४४ हजार ९९४ रुपयांची वसुली झाली.
 

स्पेशल ड्राइव्हची ३८४ प्रकरणे निकाली
 या लोकअदालतीत स्पेशल ड्राइव्हअंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये ४८८ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी, टेलिफोन, बँक रिकव्हरी यांचे पूर्वन्यायप्रविष्ट प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.

Web Title: Settlement of 10 thousand cases in Lok Adalat, parties expressed satisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.