तहसील कार्यालयातील सेतू केंद्र आठ दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:56+5:302021-07-23T04:18:56+5:30
लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण शाळा-कॉलेज बंद होते; पण शासनाने कोरोनाचा प्रभाव कमी होताच नियमानुसार शाळा-कॉलेज सुरू करण्याचे आदेश दिले. शाळा-कॉलेज ...
लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण शाळा-कॉलेज बंद होते; पण शासनाने कोरोनाचा प्रभाव कमी होताच नियमानुसार शाळा-कॉलेज सुरू करण्याचे आदेश दिले. शाळा-कॉलेज लॉकडाऊनमुळे बंद असल्याने त्यावेळी कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची सेतू केंद्रावर फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण शाळा-कॉलेज आता सुरू होणार आहेत. तसेच अकरावी प्रवेशासाठी (सीईटी) लागणारी व शाळेच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्राकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. मात्र, ऐन कामाच्या वेळीच सेतू केंद्र बंद असल्याने ई-सेवा केंद्रावरून कागदपत्रे काढावी लागत आहेत. त्यातच या केंद्रावरून सर्वसामान्यांची मोठी लूट करण्यात येत आहे. केंद्रात उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर, जातीचा दाखला काढण्यासाठी ५० ते ७० रुपये खर्च येतो. ई-सेवा केंद्रावर हेच दाखले काढण्यासाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत.