बनावट हलफनामा तयार करून देणाऱ्या सेतू केंद्राची मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:35+5:302021-06-24T04:20:35+5:30

गोंदिया : रेल्वेच्या प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी बनावट हलफनामा तयार करून देणाऱ्या गोंदिया मनोहर चौकातील महाऑनलाईन सेतू केंद्राची मान्यता ...

Setu Kendra de-recognized for making fake affidavits | बनावट हलफनामा तयार करून देणाऱ्या सेतू केंद्राची मान्यता रद्द

बनावट हलफनामा तयार करून देणाऱ्या सेतू केंद्राची मान्यता रद्द

googlenewsNext

गोंदिया : रेल्वेच्या प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी बनावट हलफनामा तयार करून देणाऱ्या गोंदिया मनोहर चौकातील महाऑनलाईन सेतू केंद्राची मान्यता रद्द करण्याची कारवाई तहसीलदारांच्या अहवालावरून निवासी उपजिल्हाधिकारी जयराज देशपांडे यांनी बुधवारी (दि. २३) केली.

प्राप्त माहितीनुसार महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मोनिता शंकरराव चौधरी यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेतू केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले होते. या केंद्रामध्ये काम करणारे

ऑपरेटर विक्की मेश्राम पक्षकारांकडून रेल्वे विभागाच्या आरओआर प्रकल्पाकरिता गोंदिया तालुक्यातील कारंजा येथील कुश्मकला बाबू बानेवार यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्र. ४३/३ मधील आराजी ०.२१ हे. आर.पैकी ०.०९ ही जमीन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत आरओआर प्रकल्पाच्या बांधकामाकरिता अधिग्रहीत करण्यात आली आहे. जमिनीच्या मोबदला रकमेकरिता कुश्मकला बाबू बानेवार (रा. कारंजा), नानेश्वर आत्माराम कडूकार व काही जणांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हलफनामा या कार्यालयास सादर केला. मात्र, हा हलफनामा संशयास्पद वाटल्याने तहसीलदार, गोंदिया यांना तपासणीसाठी देण्यात आला. तहसीलदार यांच्या अहवालानुसार अर्जदार कुश्मकला बाबू बानेवार (रा. कारंजा), नानेश्वर आत्माराम कडूकार व इतर यांनी १०० रुपये स्टॅम्प पेपरवर व हलफनामा बनविण्याकरिता मोनिता चौधरी यांच्या नावे असलेले महाऑनलाईन सेतू केंद्र, मनोहर चौक, गोंदिया येथे तयार केलेला हलफनामा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोनिता चौधरी यांच्या नावे मनोहर चौक, गोंदिया येथे असलेले महाऑनलाईन सेतू केंद्र त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. ही गंभीर स्वरूपाची चूक असून, हे सेतू केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सक्तीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात यापुढेही सेतू केंद्राची माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या चमूकडून अशीच आकस्मिक तपासणी करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Setu Kendra de-recognized for making fake affidavits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.