सेतू केंद्राला पाच हजार रुपयांचा दंड, तर एक केंद्र बंद करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:26 AM2021-03-22T04:26:37+5:302021-03-22T04:26:37+5:30
गोंदिया : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील नागरिकांमध्ये व सेतू केंद्रामध्ये पारदर्शकता राहावी, जनतेची लुबाडणूक होऊ नये व सामान्य नागरिकांचा ...
गोंदिया : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील नागरिकांमध्ये व सेतू केंद्रामध्ये पारदर्शकता
राहावी, जनतेची लुबाडणूक होऊ नये व सामान्य नागरिकांचा सेतू केंद्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेतू केंद्र तपासणी पथक तयार करण्यात आलेले आहे.
पथकाने सडक अर्जुनी तालुकाअंतर्गत सेतू केंद्राची तपासणी केली. तपासणीमध्ये अरविंद पातोडे व अंकीत गुप्ता या केंद्रचालकाने शासन निर्णयानुसार ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे फलक केंद्राला लावलेले
नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सेतू केंद्राला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पलिंद्र अंबादे यांचे मूळ सेतू केंद्र महिला बचत गट पलिंद्र अंबादे यांच्या नावे असलेली सेतूची
आय. डी. त्यांचे मूळ कार्यालय महिला बचत गटाला कामाकरीता देण्यात आलेली होती. परंतु बचत गट प्रामुख्याने सेतू
केंद्राची आय. डी. दुसऱ्याला देऊन (प्रशांत झेराक्स) तहसील कार्यालय, सडक अर्जुनीच्या समोर २० मीटर अंतरावर
हलविण्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन निर्णयानुसार गंभीर चूक असून, जिल्हाधिकारी यांच्या
आदेशान्वये सदरील सेतू केंद्र कायमस्वरुपी बंद करण्याबाबत सक्तीचे आदेश दिले. या तपासणी
पथकामध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे एच. जी. पौनीकर व विशाल बागडदे यांचा समावेश होता.
तहसील कार्यालय सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील सेतू केंद्राचीसुध्दा तपासणी स्वतंत्र पथकाद्वारे
अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केली आहे.