सात दिवसांत ४८३० जणांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:26+5:302021-04-30T04:37:26+5:30

कोरोनासंदर्भात केली जात असलेली जनजागृती, लसीकरणावर भर, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ...

In seven days, 4,830 people lost to Corona | सात दिवसांत ४८३० जणांनी कोरोनाला हरविले

सात दिवसांत ४८३० जणांनी कोरोनाला हरविले

Next

कोरोनासंदर्भात केली जात असलेली जनजागृती, लसीकरणावर भर, लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सर्वांचे परिणाम म्हणजे २२ ते २८ एप्रिल या कालावधी कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. कोरोनावर मात करण्याचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने मात करणाऱ्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. २२ ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ४१९९ बाधितांची नोंद झाली, तर ४८३० बाधितांनी कोरोनावर मात केली. १०९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत बाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ निश्चितच अधिक आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चित दिलासादायक बाब आहे. सध्या सर्वत्र कोरोना बाधितांचे आकडे वाढत असताना जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत रुग्णसंख्येत होत असलेली घट कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे संकेत देत आहे. मात्र कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर आणि लक्षणे दिसताच वेळीच तपासणी करून उपचार घेण्याची गरज आहे.

................

दररोज ६९० बाधितांची कोरोनावर मात

मागील सात दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या पाहता सरासरी दररोज ६९० कोरोना बाधित कोरोनावर मात करीत आहेत. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी सुखद बाब आहे. यामुळेच कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कोरोना संकट काळात ही दिलासादायक बाब आहे.

...........

बिनधास्तपणे घ्या लस

कोरोनाला हरविण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात अफवा पसरविल्या जात असल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्तपणे कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी.

...............

असा आहे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख

२२ एप्रिल : ५८१, २३ एप्रिल : ७४२, २४ एप्रिल ६६३, २५ एप्रिल ६१२, २६ एप्रिल ५७८, २७ एप्रिल ८९५, २८ एप्रिल ७५९

...................

बाधितांची संख्या

२२ एप्रिल ६६२, २३ एप्रिल ६७५, २४ एप्रिल ५८३, २५ एप्रिल ६४५, २६ एप्रिल ६०३, २७ एप्रिल ५५५, २८ एप्रिल ४७६

...................

मृतकांची संख्या

२२ एप्रिल ११, २३ एप्रिल २१, २४ एप्रिल २१, २५ एप्रिल १३, २६ एप्रिल १७, २७ एप्रिल १२, २८ एप्रिल १४

Web Title: In seven days, 4,830 people lost to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.