सात महिन्यात एकाही घरकुलाचे काम पूर्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:26+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशभरात प्रधानमंत्री आवास उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात सन २०१९-२० या वर्षात १ लाख ५१ हजार ४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. परंतु राज्य सरकारच्या योजनेतून फक्त १४ आवास मंजूर करण्यात आले. मंजूर आवासापैकी २४ हजार १४४ आवासांची कामे सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारचे २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु मागील सात महिन्यात एकाही घरकुलाच्या कामाला सुरूवात झाली नसल्यामुळे सन २०१९-२० या वर्षाच्या सात महिन्यात एकाही घरकुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यावर्षी ३ हजार ४६५ आवासांना मंजुरी मिळाली परंतु एकाही कामाला सुरूवात झाली नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशभरात प्रधानमंत्री आवास उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात सन २०१९-२० या वर्षात १ लाख ५१ हजार ४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. परंतु राज्य सरकारच्या योजनेतून फक्त १४ आवास मंजूर करण्यात आले. मंजूर आवासापैकी २४ हजार १४४ आवासांची कामे सुरू करण्यात आले. तर १३५७ आवासांची कामे पूर्ण झाली आहेत.राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मंजूर आवासांपैकी फक्त ४ आवासांची कामे सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ३ हजार ४६५ आवासांना मंजुरी देण्यात आली.यापैकी फक्त ६० आवासांची कामे सुरू आहेत.परंतु आतापर्यंत एकाही आवासांचा काम सुरू झाले नाही. जिल्ह्यात राज्य सरकारच्या योजनेंतर्गत ११ आवास मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २ आवासांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात मंजूर आवासांमध्ये आमगाव ३१३, अर्जुनी मोरगाव १८, देवरी ६१३, गोंदिया १७८१, गोरेगाव १९०, सडक-अर्जुनी २, सालेकसा २२८, तिरोडा ३२० आवासांचा समावेश आहे. या मंजूर असलेल्या आवासांपैकी देवरीत ८, गोंदिया ४२, गोरेगाव ७, सालेकसा ३ आवासांची कामे सुरू आहे. यापैकी एकही आवासाची कामे पूर्ण झाली नाही. राज्य सरकारच्या योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगावात १० तसेच गोरेगावात १ आवासाला मंजुरी देण्यात आली. यात अर्जुनी-मोरगाव मध्ये २ आवासाची काम सुरू आहेत. जिल्ह्यात सन २०१८-१९ वर्षात २०४८ आवासांना मंजुरी देण्यात आली. यातील १४४८ आवासांची कामे सुरू आहेत. १४२९ आवासांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी आमगाव १४३, अर्जुनी-मोरगाव ४८७, देवरी ३२८,गोंदिया ४३६, गोरेगाव ९९, सडक-अर्जुनी १०८, सालेकसा १४९, तिरोडा २९८ मंजूर आवासांचा समावेश आहे. आमगावात १३२, अर्जुनी-मोरगाव १५३, देवरी १५१, गोंदिया ४७४, गोरेगाव १३५, सडक-अर्जुनी ८०, सालेकसा १२४, तिरोडा १९९ आवासांची कामे सुरू आहेत.
१४२९ आवासांची कामे पूर्ण
जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये मंजूर आवासांपैकी १४२९ आवासांची कामे पूर्ण झालीत. परंतु सन २०१९-२० मधील एकही आवासाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सन २०१८-१९ मध्ये आमगावातील २७, अर्जुनी-मोरगाव ७५, देवरी १७०, गोंदिया ४२२, गोरेगाव २२८, सडक-अर्जुनी १४४, सालेकसा २४०, तिरोडा १२३ आवासांची कामे पूर्ण झाली आहेत.