चोरीच्या प्रकरणात सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:31 PM2019-08-14T22:31:20+5:302019-08-14T22:31:52+5:30

कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली.

Seven people arrested for burglary | चोरीच्या प्रकरणात सात जणांना अटक

चोरीच्या प्रकरणात सात जणांना अटक

Next
ठळक मुद्दे१ लाख ८० हजाराचा माल जप्त : रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली.
बन्सोड कुटुंबीय लग्नसभारंभासाठी धामणगाव येथे असताना ईश्वर उर्फ मनिष प्रकाश भालाधरे (२६) रा.आंबेडकर चौक कुडवा, सिद्धार्थ तेजराम बागडे (३३) रा.आंबेडकर चौक कुडवा, प्रविण उर्फ लक्की मेश्राम (१९) रा.आंबेडकर चौक कुडवा, राहूल दिनेशसिंह बरेले (२१) रा.कॉलेजटोली कुडवा, रामकिसन बारकू तिवाडे (३५) रा.खैरलांजी जि.भंडारा, शैलेश बळीराम फुंडे (३१) रा.बाम्हणी बोरकन्हार ता. आमगाव, प्र्रवेश उर्फ छोटू नरेंद्र मेश्राम (२०) रा.आंबेडकर चौक कुडवा यांना संशयावरुन अटक करण्यात आली आहे.त्यांची ५ दिवसाची पोलीस कोठडी घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी सदर गुन्ह्याची कबूली दिली.
या प्रकरणातील दोन आरोपींना कुडवा येथून तर उर्वरित आरोपींना तुमसर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात २३१० रुपयाचा एक डोरला, १४ हजार १४ रुपये किमतीचे लटकन, ४ हजार ३४२ रुपयाचे कानातील सोन्याचे बटन टॉप्स, ३ हजार ६३४ रुपयाचे सोन्याचे दोन टॉप्स, १ हजार ५४० रुपयाचे दोन नग सोन्याचे रिंग, १ हजार ५८९ रुपये किमतीचे एक पायल, ३१ हजार १५ रुपये किमतीची एक सोन्याची साखळी, ११ हजार ७७४ रुपयाचे सोन्याचे पदक, ११ हजार ५८० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, १० हजार ७१८ किमतीची सोन्याची पाचाली, २ हजार ६६५ रुपये किमतीचा चांदीचा कमरबंद, ५ हजार १५० रुपये किमतीचे चांदीचे पायल, ३२४ रुपये किमतीचा चांदीचा आकडा,४४७ रुपये किमतीचा एक कडा, ५१७ रुपये किमतीचे चांदीचे जोडवे, ६४३ रुपयाचा चांदीच्या बिछया,६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, १६ हजार ७६० रुपये रोख व इतर साहित्य असा एकूण १ लाख ७९ हजार ३२ रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशाने धमेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांना सदर मुद्देमाल परत करण्यात आला.पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासमोर बन्सोड यांना दागिने सोपविण्यात आले.
सदर कारवाई पोलीस हवालदार नामदेव बनकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुंभार, दारासिंग पटेल,राजकुमार खोटेले, धनंजय बडवाईक, शाम राठोड यांनी केली.

Web Title: Seven people arrested for burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.