सात तालुके झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:26+5:302021-08-14T04:34:26+5:30

जिल्ह्यात मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४११९५ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ७०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू ...

Seven talukas became corona free | सात तालुके झाले कोरोनामुक्त

सात तालुके झाले कोरोनामुक्त

Next

जिल्ह्यात मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४११९५ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ७०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ एकच कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्याने आणि प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.१३) ५६१ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४८६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४११७४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२२७९१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८३८३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४११९५ नमुने कोरोना बाधित निघाले. यापैकी ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

...........

जिल्ह्यात ५१ टक्के लसीकरण

कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच शासन आणि प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६५८५२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ५१५६९९ नागरिकांना पहिला डोस तर १४२८२९ नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण ५१ टक्के लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Seven talukas became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.