सत्तरीतील भागरथा करते अजूनही पंक्चर दुरूस्तीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:00 AM2020-03-08T05:00:00+5:302020-03-08T05:00:02+5:30
आमगावच्या भवभूती नगरात राहणाºया भागरथा मनिराम फुंडे ह्या आजघडीला ६५ ते ७० वर्षाच्या आहेत. तरीही त्या आजही वाहनात हवा भरणे तसेच पंचर दुरूस्तीचे काम करतात. पती मनिराम फुंडे हे हवा व पंचर दुरूस्तीचे काम आमगाव-देवरी मार्गावर करीत होते. त्यांचे नाव आमगावात पंचर दुरूस्तीसाठी प्रसिध्दी असल्याने कामाचा व्याप पाहता पतीच्या कामात मदत करायला त्यांनी वयाच्या २६ वर्षी हा व्यवसाय सुरू केला.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पतीच्या व्यवसायाला हातभार लावता-लावता तेच तिच्या जगण्याचे साधन झाले. पुरूषांच्या बरोबरीने पंचर दुरूस्तीचे काम करणाऱ्या झाडीपट्टीतील भागरथाबाई फुंडे यांच्या कामाची दखल माध्यमांनी घेतली. पाहता पाहता तिच्यावर लघु माहितीपट तयार करण्यात आला. त्या माहितीपटाला अहमदनगर येथे १५ ते १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या १३ व्या प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात‘फुंडे हवा पंक्चर’ या माहितीपटाला ज्युरी अवॉर्ड देण्यात आला.
आमगावच्या भवभूती नगरात राहणाºया भागरथा मनिराम फुंडे ह्या आजघडीला ६५ ते ७० वर्षाच्या आहेत. तरीही त्या आजही वाहनात हवा भरणे तसेच पंचर दुरूस्तीचे काम करतात. पती मनिराम फुंडे हे हवा व पंचर दुरूस्तीचे काम आमगाव-देवरी मार्गावर करीत होते. त्यांचे नाव आमगावात पंचर दुरूस्तीसाठी प्रसिध्दी असल्याने कामाचा व्याप पाहता पतीच्या कामात मदत करायला त्यांनी वयाच्या २६ वर्षी हा व्यवसाय सुरू केला. पतीसोबत काम करता-करता सर्व गोष्टी त्या शिकल्या. सोबत मुला-मुलींचा सांभाळही त्यांनी केली.याची दखल घेत लोकमतसह विविध वृत्तपत्रांनी व इलेक्ट्रानिक मीडियाने दखल घेत त्यांच्यावर स्टोरी तयार केल्या. यामुळे त्यांच्या प्रसिध्दीत आणखी भर पडली. त्यातच सालेकसा तालुक्याच्या कडौतीटोला येथे राहणारी तरूणी एल.प्रियंका (प्रियंका कोरे) हिने पुणे येथील माहिती आणि विद्यापीठात शिक्षण घेताघेता भागरथा फुंडे यांच्यावर माहितीपट तयार केला. या माहितीपटाचे छायाचित्रण रविराज अडसूळ यांनी केले. सलग २३ वर्षांपासून पंचर दुरूस्तीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भागरथा फुंडे यांच्यावर २२ मिनीटांचा माहितीपट तयार करून अहमदनगर येथे १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या १३ व्या प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर केला.एल. प्रियंका हिने तयार केलेल्या या पहिल्या माहितीपटाला पहिलाच अवॉर्ड मिळाला आहे. आता पुन्हा एल.प्रियंका दुसरे लघुचित्रपट झाडीपट्टीतच तयार करीत आहे.