पीक पाहणी ॲपमध्ये अनेक अडथळे; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:36 AM2021-09-16T04:36:31+5:302021-09-16T04:36:31+5:30

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पेरा आपणच भरावा, हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲण्ड्राॅईड मोबाइल उपलब्ध नाही. ज्या ...

Several hurdles in the crop inspection app; Farmers in trouble | पीक पाहणी ॲपमध्ये अनेक अडथळे; शेतकरी अडचणीत

पीक पाहणी ॲपमध्ये अनेक अडथळे; शेतकरी अडचणीत

Next

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पेरा आपणच भरावा, हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲण्ड्राॅईड मोबाइल उपलब्ध नाही. ज्या शेतकऱ्याकडे मोबाइल नाही अशा शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीचे झाले आहे. पिकाची नोंद करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर दिली होती. जे शेतकरी पीक पाहणी ॲपमध्ये पिकाची नोंद करणार नाहीत, त्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा राहील. परिणामी त्या शेतकऱ्यांना कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही. सध्याचा काळ हा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने फारच अडचणीचा आहे. खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांजवळील होता नव्हता पैसा खर्च झाला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. ॲण्ड्राॅईड मोबाइल फोन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. त्यामुळे मोबाइल खरेदी कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही शेतकऱ्याची वास्तवता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाइल उपलब्ध आहेत, ते शेतकरी पिकाची नोंदणी करताना दिसून येत आहेत; परंतु पिकाची नोंदणी करताना कधी कधी हे ॲप ओपन होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी सहायक, तलाठी शेतकऱ्यांच्या मदतीला असले तरीही मोबाइल ॲप चालविण्यासाठी नेटवर्क मिळत नसेल तर काय उपयोग? यामुळे पीक पाहणी योजना कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांसाठी हा ॲप त्रास देणारा ठरला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

Web Title: Several hurdles in the crop inspection app; Farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.