केशोरीत कोरोना रुग्ण वाढीची गंभीर समस्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:06+5:302021-04-18T04:28:06+5:30
केशोरी : कोरोना महामारीचे रुग्ण झपाट्याने वाढत चाललेल्यांच्या पार्श्वभूमीवर केशोरी कनेरी येथे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन येण्याजाण्यासाठी रस्ते बंद ...
केशोरी : कोरोना महामारीचे रुग्ण झपाट्याने वाढत चाललेल्यांच्या पार्श्वभूमीवर केशोरी कनेरी येथे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन येण्याजाण्यासाठी रस्ते बंद करुन कडक संचारबंदी केली आहे. जागोजागी पोलीस कर्मचारी करडी नजर ठेवून सेवा अर्जीत करीत आहेत. अशावेळी नागरिकांनी सहकार्याची भावना ठेवून घरातच सुरक्षित रहा, विनाकारण गावात फिरल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा ठाणेदार संदीप इंगळे यांनी दिला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी,कनेरी या गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुका प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करुन प्रत्येक रस्त्यावर पोलीस कर्मचारी उभे राहून सेवा देत आहेत. कोणत्याही नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये,वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठीचा उद्देश असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्याकरीता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. नागरिक विनाकारण फिरताना गावात दिसून आले तर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. कायद्याच्या अमंलबजावणी व नागरिकांच्या आरोग्यासाठी घरात राहूनच सहकार्य करावे अन्याथ नाईलाजास्तव कारवाई करवी लागेल असा इशारा ठाणेदार संदीप इंगळे यांनी दिला आहे.