पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 08:17 PM2018-04-25T20:17:21+5:302018-04-25T20:17:21+5:30

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

The severe water scarcity | पाण्याची भीषण टंचाई

पाण्याची भीषण टंचाई

Next
ठळक मुद्देविहिरी आटल्या, बोअरवेल बंद : टँकरद्वारे केला जातो पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पळसगाव-डव्वा येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलस्वराज्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाण्याची पूर्तता होत होती. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे व विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे तसेच बोअरवेल बंद पडल्यामुळे गावकऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.
पळसगाव येथे कुंभारटोली, माताटोली, मुंढरीटोला आणि पळसगाव असे चार टोले असून पाण्याची मोठीच समस्या निर्माण झाली आहे. समस्या माहिती होताच सरपंच डॉ.बी.एम. पटले, उपसरपंच हिरालाल चवरे, ग्रामपंचायत सदस्य सेवक बागळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुलाल रंगारी, मुकेश अग्रवाल, रामचरण राऊत, दिलीप कोल्हारे, सर्व सदस्य व गावकरी यांच्या प्रयत्नाने पाण्याचे टँकर लाऊन पाण्याची समस्या सोडविण्यात आली.
अशी समस्या नेहमीच उद्भवत असल्याने ग्रामस्थ त्रस्त असून भीषण पाणी समस्या पुढे निर्माण होऊ शकते. याकरिता शासनाने लक्ष देवून मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये नाव समाविष्ट करुन गावांमध्ये नळयोजनेचा समावेश करावा व पाणी समस्या सोडवावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: The severe water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.