जिल्ह्यातील ५० गावांत होणार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:30+5:302021-02-19T04:18:30+5:30

गोंदिया : गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावातील रोगराई दूर करण्याचा उपक्रम आता सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ ...

Sewage and solid waste management in 50 villages of the district () | जिल्ह्यातील ५० गावांत होणार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ()

जिल्ह्यातील ५० गावांत होणार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ()

Next

गोंदिया : गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गावातील रोगराई दूर करण्याचा उपक्रम आता सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२०-२१च्या वार्षिक कृती आराखड्यात एकूण ८६९ गावांपैकी ५० गावांमध्ये शासनाच्या नवीन धोरणानुसार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

त्यात आमगाव तालुक्यातील ५, अर्जुनी-मोरगाव ५, देवरी ५, गोंदिया १०, तिरोडा ९, गोरेगाव ७, सडक-अर्जुनी ५, सालेकसा चार अशा एकूण ५० गावांत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये ८१ सार्वजनिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोंदिया तालुक्यात ११ सार्वजनिक शौचालय व प्रत्येक तालुक्यात १० असे एकूण ८१ शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी प्रदीप डांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Sewage and solid waste management in 50 villages of the district ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.