शंभूटोला वाघ नदीतून अवैध रेती चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:38 PM2019-01-28T21:38:15+5:302019-01-28T21:38:30+5:30

वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली असून आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला आहे. मागील महिनाभरापासून रात्रंदिवस ही रेती चोरी होत आहे. परंतु रेती माफीयांशी आमगावच्या महसूल विभागातील काही अधिकाºयांशी संगणमत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Shambhutola illegal sand evasion from the river Wagh | शंभूटोला वाघ नदीतून अवैध रेती चोरी

शंभूटोला वाघ नदीतून अवैध रेती चोरी

Next
ठळक मुद्देमहसूल विभागाचे मौन : तरूणांच्या तक्रारीकडे महिनाभरापासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली असून आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला आहे. मागील महिनाभरापासून रात्रंदिवस ही रेती चोरी होत आहे. परंतु रेती माफीयांशी आमगावच्या महसूल विभागातील काही अधिकाºयांशी संगणमत असल्याची जोरदार चर्चा आहे.
न्यायालयाने घाट लिलाव करण्याची परवानगी न दिल्यामुळे जिल्ह्यातील एकही घाटाचा लिलाव झाला नाही.मात्र रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. आमगाव तालुका वगळता सातही तालुक्यात रेती चोरी संदर्भात काहीना काही कारवाई होत असल्याचे चित्र आहे. मात्र मागील दोन वर्ष रेती चोरांवर अंकुश लावणारा आमगावचा महसूल विभाग यंदा रेती माफीयांवर मेहरबान का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आमगाव तालुक्यातून वाहून जाणाºया वाघ नदीची रेती मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. महसूल विभाग व रेती माफीया यांच्यात ताळमेळ बसल्यामुळे रेती चोरांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. मागील महिनाभरापासून शंभूटोला येथील वाघनदीच्या घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे. दररोज जवळपास ५० ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. या घाटातून ५०० ते १००० ब्रास रेतीचा उपसा करून दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक होत असली तरी महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गोंदिया, सडक-अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्याने रेती चोरांवर अंकुश ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु आमगाव येथील महसूल विभागाने या रेती माफीयांना अभयदान देऊन त्यांच्यावर करणाºया कारवाईकडे दुर्लक्ष केले.
आमगाव तालुक्यातील बहुतांश घाटांची हीच स्थिती आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी शंभूटोला येथील उपसरपंच होलीराम शिवणकर, देवेंद्र लिल्हारे, श्रीकांत शिवणकर, महेंद्र पाथोडे, मितेश शिवणकर, सचिन मेंढे, हुकूमचंद शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य ललीता शिवणकर, ओमकार शिवणकर व गावकºयांनी केली आहे.

तहसीलदाराला दाखविला व्हिडिओ व फोटो
शंभूटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला जात असताना महसूल विभाग काहीच कारवाई करीत नसल्याचे पाहून गावातील शेकडो तरूणांनी एकत्र येऊन त्या ट्रॅक्टर चालकांना पकडले. परंतु त्यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी आले नाहीत. त्यामुळे त्या माफीयांना रेती घेऊन सहज जाता आले. आता रेती माफीयांचा एवढा जोर वाढला की ते गावकºयांना न जुमानता रेतीची सर्रास वाहतूक करीत आहेत. यासंदर्भात तरूणांनी काढलेल्या फोटो व तयार केलेल्या व्हिडिओ तहसीलदार साहेबराव राठोड यांना दाखविला.आता त्या रेती माफीयांवर काय कारवाई होते याकडे तरूणांचे लक्ष लागले आहे.

रेती चोरीचा यंदा एकही दंड नाही
आमगाव तहसील कार्यालयाने मागील दोन वर्षात रेती चोरांवर वचक ठेवून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला होता. दंड वसूल करण्यात आमगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर होता. परंतु यंदा एकही रेती चोराला १ लाख १५ हजाराचा दंड केला नाही. याचाच अर्थ कुठे तरी पाणी मूरत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Shambhutola illegal sand evasion from the river Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.