शशीकरण पहाडीजवळील बंधारा ठरतोय नाममात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:23+5:30

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात.

Shashiqan a dam near the hill only Nominal | शशीकरण पहाडीजवळील बंधारा ठरतोय नाममात्र

शशीकरण पहाडीजवळील बंधारा ठरतोय नाममात्र

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील शशीकरण पहाडीजवळ शासनाने लाखो रुपये खर्चून बंधारा तयार केला. मात्र या बंधाऱ्याव्दारे कुठलेच सिंचन होत नसल्याने या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना सुध्दा फायदा होत नाही.बंधाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाने सुध्दा दुर्लक्ष केल्याने हा बंधारा केवळ नाममात्र ठरत आहे.
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात. तत्कालीन माजी मंत्री व आमदार यांच्या प्रयत्नाने भाविकांची आंघोळीची सोय व्हावी, यासाठी बंधाऱ्याचे नियोजन करून बांधकाम करण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या बांधकामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे बंधाऱ्यांत पाणी साचून राहत नाही. परिणामी भाविकांची सुध्दा गैरसोय होत आहे.
या बंधाऱ्यामुळे नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय झाली असती. या परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.त्यामुळे या बंधाऱ्याची मदत होत होती. मात्र आता पाणी साचून राहत नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील बाम्हणी, खडकी, डोंगरगाव,देवपायली, डुग्गीपार आदी गावातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदत होऊ शकते. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांचे जाणारे जीव सुध्दा वाचविणे शक्य होणार आहे.

Web Title: Shashiqan a dam near the hill only Nominal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग