तिने स्वीकारले अनाथ बालकांचे पालकत्व...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:29+5:30
औषधासाठी पैसा नाही. वेदनेने आईचे विव्हळने हे तिन्ही भावंडे अगतिकपणे पहात होते. रोजचे बाराशे रुपये आईला इंजेक्शन देण्यासाठी लागेल. काय करावं सर्वात मोठी असलेल्या सरिता समोर प्रश्न उभा झाला. आईला तिने जीवाचा आटापिटा करीत वाचिवण्याचा प्रयत्न केला. सर्व मार्ग बंद झालेले दिसले म्हणून तिने काबाळ कष्ट करुन आईच्या इंजेक्शनसाठी बाराशे रुपये ती देऊ लागली. यानंतरही ती आईला वाचवू शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रत्येकाच्या वाट्याला आयुष्यात सुखाचे क्षण येतीलच असे नाही. क्षणो क्षणी काटेरी पाऊल वाटेने आयुष्यभर एखाद्याला मार्गक्रमण करावे लागते. सुखद आनंदी हसतं-खेळतं ना कुणाला बालपण लाभत ना कुणाला तरुणपण लाभतं. पण विक्राळ परिस्थितीवर मात करत येणाऱ्या दिवसावर जे आपले नाव गोंदवितात त्याचीच इतिहास दखल घेते. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने स्वत: अनाथ झालेल्या सरिताने आज तीन बालकांना दत्तक घेवून समाजपुढे आदर्श ठेवला आहे. मदर्स डे च्या निमित्ताने अशाच एका संघर्ष नायिकेचा काहणी.
ही आहे सरिता बालकदास गजभिये, आसोली येथील मुलगी. २००५ मध्ये बालपणीच तिच्या वडिलाचा मृत्यू झाला. आईच्या छत्रछायेत हे तिन्ही भावंडे जगत होती. पण नियतीला ते देखील मान्य नव्हते. आईला कॅन्सर झाला असे निदान झाले आणि या तिन्ही भावंडांच्या पायाखालची वाळू सरकली. औषधासाठी पैसा नाही. वेदनेने आईचे विव्हळने हे तिन्ही भावंडे अगतिकपणे पहात होते. रोजचे बाराशे रुपये आईला इंजेक्शन देण्यासाठी लागेल. काय करावं सर्वात मोठी असलेल्या सरिता समोर प्रश्न उभा झाला. आईला तिने जीवाचा आटापिटा करीत वाचिवण्याचा प्रयत्न केला. सर्व मार्ग बंद झालेले दिसले म्हणून तिने काबाळ कष्ट करुन आईच्या इंजेक्शनसाठी बाराशे रुपये ती देऊ लागली. यानंतरही ती आईला वाचवू शकली नाही. ३१ मार्च २०१३ ला तिच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. दुर्दैवाचे दशावतार कमी होते की काय तिचं घर पडलं. त्या गावच्या शिक्षकांनी या भावंडांना सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर यांच्याकडे पाठविले. या घटनेला आता चार-पाच वर्षे लोटली. सरिताच घर बांधण्यासाठी बेदरकर यांनी जिथून जमेल तिथून मदत मिळवू देण्याचा प्रयत्न केला.
अशात त्यांनी जमीन विकली आणि सरिताला घर बांधण्यासाठी दहा हजार रुपये रोख आणि तीन ट्रॉली विटा आणि रेतीची मदत केली. त्यानंतर कशा बश्या घराच्या चार भिंती उभ्या राहिल्या. त्यानंतर घरावर स्लॅब टाकण्यासाठी पुन्हा बेदरकर यांनी २५ हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे सरिताच घर तयार झाल. मात्र तोपर्यंत सरिताचे लग्नाच वय येऊन ठेपलं होतं. शेवटी घराजवळच्याच एका मुलाने तिला मागणी घातली. सविता बेदरकर यांनीच पुढाकार घेवून तिचे लग्न लावून दिले. लग्न झाल्याबरोबर एम. एस. डब्ल्यूला अॅडमिशन केलं. त्याचबरोबर इंडस प्रोजेक्टमध्ये तिला नोकरीला लावून दिले.
आज ती एम.एस.डब्ल्यू.टॉपर आहे. तिचा भाऊ बादल आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये लागलाय. आता त्याचे लोको पायलेटमध्ये सिलेक्शन झाले. आज सरिता एका मुलीची ती आई आहे.सुखाचा तिचा संसार आहे. आज तिचा संसार फुलला आहे. तिने नेट सेटची परीक्षा दिली. महिला बाल विकास अधिकाºयाची परीक्षा दिली. सध्या तिचा निकाल यायचा आहे. एक ना एक दिवस ती क्लास वन अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही कारण तिच्यात जिद्द आहे, स्वाभिमान आहे.
सरिताने स्वीकारली तीन अनाथांची जबाबदारी
सरिताने सुपलीपार येथील नातेवाईकांच्या तीन अनाथ मुलींच्या संगोपनाची नैतिक जबाबदारी स्वीकारली. एक मुल सांभाळायचं म्हणजे भलेभले हात टेकतात. स्वत:ची तिची तीन वर्षाची मुलगी असताना सुपलीपार येथील एक दहा वर्षाची एक ९ वर्षाची तर एक ४ वर्षाची मुलगी ती स्वत:च्या मुलीबरोबर सांभाळते. तथागत हा केवळ भाषणाचा विषय नाही तर जगण्याचा विषय आहे हे या मातृवत्सल तरुणींने ते दाखवून दिले.
एक ना एक दिवस सरिता क्लास वन अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही कारण तिच्यात जिद्द आहे, स्वाभिमान आहे. मला या मुलांचा प्रचंड अभिमान आहे. ही मुले समाजातील मोठी मोठी पदे भूषवतील.
- डॉ.सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या.
बादल म्हणतो मी देणार मदतीचा हात
सरिताचा भाऊ बादलने सुध्दा आपल्या परिस्थितीचे भान ठेवत भरपूर अभ्यास केला. काही महिन्यापूर्वीच त्यांनी रेल्वे लोको पायलटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याला पुढे एमपीएससी यूपीएससी परीक्षा क्र ॅक कररायची आहे. बुध्दविहारात रात्र रात्रभर अभ्यास- जागरण बादल करायचा. त्याचचे आज फलित झाले आहे. सविता बेदरकर या त्याला शिक्षण आणि पुस्तकाने तुमची परिस्थिती बदलली तर तुमच्यापासून दूर गेलेले सर्वच जवळ येतील असे सांगत होत्या. त्याने सुध्दा खूप अभ्यास करुन परिश्रम घेतले. बादल म्हणतो मला जेव्हा स्थायी नोकरी लागेल तेव्हा मी गरजूंना मदतीचा हात देईन.