‘त्या’ चार अनाथ मुलींना ५५ हजारांची मदत

By admin | Published: June 12, 2017 01:26 AM2017-06-12T01:26:01+5:302017-06-12T01:26:01+5:30

मानवी जीवन जगत असतानी प्रत्येकाला आपल्या कुटूंबाची आत्मीयता असते. आजच्या धकाधकीच्या

'She' provided 55 thousand aid to four orphan girls | ‘त्या’ चार अनाथ मुलींना ५५ हजारांची मदत

‘त्या’ चार अनाथ मुलींना ५५ हजारांची मदत

Next

‘साकोली के सितारे ग्रुपचा’ पुढाकार : तुमसरे घेणार आरोग्याची जबाबदारी
ंलोकमत न्यूज नेटवर्क
ुेबोंडगावदेवी : मानवी जीवन जगत असतानी प्रत्येकाला आपल्या कुटूंबाची आत्मीयता असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात इतराविषयी सहानुभूती निर्माण होणारे क्षण विरळेच असतात, असे सर्वश्रृत घडत असले तरी आजही माणूसकी व परमार्थ साधण्याची तऱ्हा जिवंत असल्याचा प्रत्यय ‘साकोली के सितारे ग्रूप’ ने उदार अंत:करणाने ‘त्या’ चार अनाथ मुलींना रोख ५५ हजार रूपयांच्या मदतीने शनिवारी निमगाव येथे दाखवून दिली.
जवळील निमगाव-बोंडगावदेवी येथील सूर्यवंशी परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळून २५ दिवसांच्या फरकाने पती-पत्नीचे निधन झाल्याने चार मुली अनाथ होऊन पुढील जीवन कसे व्यतित करायचे हा प्रश्न त्या निरागस मुलींसमोर पडला. अनाथ झालेल्या ४ मुलींना समाजातील दानदात्यांकडून आर्थिक पाठबळ मिळावे हाच हेतू समोर ठेवून एक सामाजिक बांधीलकीचे प्रत अंगीकारून ‘लोकमत’ने २४ मे च्या अंकात पतीच्या पाठोपाठ पत्नीचीही प्राणज्योत मालवली. ‘त्या अनाथ लेकींना नाथाची गरज’ या मथळ्याखाली मनाला हेलावून सोडणारी बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील सामाजिक कार्यकर्त्यानी घेऊन ‘साकोली के सितारे या वाटसअप ग्रुपवर’ ती बातमीच पोस्ट केली.
सदर ग्रुपच्या ५५ सदस्यांनी अनाथ झालेल्या त्या ४ मुलींसाठी मदत करण्याचा मनोमन संकल्प केला. डॉ. अजय तुमसरे आपल्या सहकाऱ्यांसह त्या निरागस लेकींना भेटून सांत्वना करण्यासाठी प्रत्यक्ष निमगावला त्यांच्या घरी येवून त्या चारही बहिणींची मोठ्या आस्थेने विचारपूस केली. तुमच्या उज्वल भविष्यासाठी ‘साकोली के सितारे ग्रूप’ तुमच्या सोबत राहून वेळोवेळी तुम्हाला मदतीसाठी धावून येईल व पालकांचे भरभरून प्रेम देऊ, असे आपुलकीचे अभिवचन पहिल्याच भेटीत डॉ. तुमसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांसमक्ष दिले. तर शनिवारी (दि.१०) डॉ. तुमसरे आपल्या सहकाऱ्यासह त्या अनाथ बहिणींच्या निमगाव या राहत्या घरी आहे. झोपडीवजा घरामध्ये तहसीलदार डी.सी.बोंबर्डे, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गावचे पोलीस पाटील संजय कापगते, लहू गहाणे, माधव चचाणे यांच्या उपस्थितीत त्या ४ अनाथ लेकींच्या हातामध्ये रोख ५५ हजार रुपये ‘साकोली के सितारे ग्रूप’च्यावतीने सुपूर्द करण्यात आले. गरजू व अनाथांना मदत करण्याचा आमचा मानस असल्याचे सांगत डॉ. तुमसरे यांनी त्या चारही बहीणींच्या आरोग्याची जबाबदारी स्वत: घेत असल्याचे ग्रामस्थांसमोर सांगितले. यापुढे वेळोवेळी आमचे मदत कार्य सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: 'She' provided 55 thousand aid to four orphan girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.