शेंडा परिसर तीन दिवसांपासून अंधारात

By admin | Published: July 24, 2014 11:56 PM2014-07-24T23:56:48+5:302014-07-24T23:56:48+5:30

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद

Sheda area in dark in three days | शेंडा परिसर तीन दिवसांपासून अंधारात

शेंडा परिसर तीन दिवसांपासून अंधारात

Next

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद पडल्यामुळे नळाचे पाणी येणे बंद झाले. पिण्याच्या पाण्यासाठी गृहिणींना फार मोठी कसरत करावी लागत आहे.
हा परिसर जंगलव्याप्त असल्याने लहान-मोठी झाडे विद्युत तारांवर तुटून पडले. यामध्ये विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा बंद झाला. परंतु त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या. या गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळयोजना आहे. परंतु तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे.
मागील आठवड्यात लागूनच असलेल्या सालईटोला गावात वीज प्रवाह बंद असल्यामुळे काळोखाचा फायदा घेत एका इसमाचा खून करून आरोप पळून जाण्यात यशस्वी ठरला. अंधार असल्यामुळे आरोपीची ओळख होवू शकली नाही. आजही आरोपीचा शोध घेण्यासाठी देवरीची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. परंतु अद्याप शोध लागला नाही.
विजेवर आधारित उपकरणे कुचकामी ठरत आहेत. विद्युत मोटारी, मोबाईल सेवा ठप्प पडल्या आहेत. शेंडा परिसरासाठी दोन लाईनमनची नियुक्ती विद्युत विभागाने जरी केली असली तरी ते दोघेही आपल्याच मौजमस्तीत चूर राहत असल्याने वीज प्रवाह पूर्ववत होण्यास विलंब होत आहे. सदर प्रतिनिधीने देवरीचे कनिष्ठ अभियंता नगराळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता गुरूवारी वीज प्रवाह सुरू होईल, असे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Sheda area in dark in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.