सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी शिक्षक भारतीचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:37+5:302021-08-21T04:33:37+5:30
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी वेळोवेळी शिक्षक भारतीने केली. या पाठपुराव्याला यश येऊन अलीकडेच ...
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी वेळोवेळी शिक्षक भारतीने केली. या पाठपुराव्याला यश येऊन अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी रोहिणी किरवे यांच्या स्वाक्षरीचे पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांना प्राप्त झाले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने वित्त विभागाला विनंती केली, असे कक्ष अधिकारी यांनी सांगितले, अशी माहिती शिक्षक भारती विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, गोंदिया जिल्हा अध्यक्ष महेंद्र सोनवाने, जितेंद्र घरडे, बाबा जांगडे, प्रमेश बिसेन, गुलाब मौदेकर, संतोष बारेवार, विलास डोंगरे, नलिनी नागरिकर, संतोष डोंगरे, पी.डी. चौहान, संतोष मेंढे, माणिकचंद बिसेन, संतोष कुसराम, राम भगत पाचे, राजू टेंभरे, राजकुमार बारसे, योगराज सलामे, घनश्याम मेश्राम यांनी दिली.