शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:00+5:302021-08-12T04:33:00+5:30
गोंदिया : शिक्षक भारती संघटनेतर्फे ९ ऑगस्ट क्रांतीदिनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिक्षक भारती एकदिवसीय राज्यस्तरीय आंदोलन करण्यात ...
गोंदिया : शिक्षक भारती संघटनेतर्फे ९ ऑगस्ट क्रांतीदिनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिक्षक भारती एकदिवसीय राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रमशाळा, विशेष शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले. शिक्षक भारती जिल्हा शाखेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, समाज कल्याण अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनातून सन २००५ पूर्वी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा जोडण्यात यावी, राज्यातील घोषित, अघोषित सर्व शाळांतील शिक्षकांना १०० टक्के अनुदान द्यावे, विशेष शाळांतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विनाअट लागू करण्यात यावा, दिव्यांग शाळांतील कंत्राटी कर्मचारी, मदतनीस, सफाईदार, पहारेकरी यांना नियमित वेतनश्रेणी देण्यात यावी, सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती (१०,२०,३०) योजनेचा लाभ इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना देण्यात यावा. ही योजना लागू होईपर्यंत शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट देण्यात यावी, प्राथमिक पदवीधर, विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन देण्यात यावे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ राबवावी. कोकण विभागाचा समावेश करावा. बदल्या १०० टक्के कराव्यात, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात यावी. ही बदली प्रक्रिया राबवित असता विस्थापित, महिला शिक्षिका, एकल शिक्षक, पती-पत्नी एकत्रितकरण, दुर्गम भागातील शिक्षक यांचा प्राधान्याने विचार व्हावा. विनंती बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून आणि सेवा ३वर्षे ग्राह्य धरण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नयेत. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर गोंदिया जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरडे माध्यमिक जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने,नलीनी नागरीकर, संतोष डोंगरे, संतोष बारेवार,ओ.एस.गुप्ता, प्राचार्य के.एल.पुसाम, प्रमेश बिसेन, बाबा जांगडे, ममता चुटे, नमिता हुमे,राजु टेंभरे, रमेश सोनवणे, रामभगत पाचे, विजय मेश्राम, भंडारी चौधरी, जे.डी.उके, प्रफुल ठाकूर, फुलचंद पारधी,एम बी.कांबळे,एस सी.कटरे,आर.बी.पटले, एल.डी.चंद्रीकापुरे यांचा समावेश होता.