शिवनीबांध जलाशय पर्यटनस्थळापासून वंचित

By admin | Published: January 3, 2016 02:22 AM2016-01-03T02:22:44+5:302016-01-03T02:22:44+5:30

शेतकऱ्यांना संकटसमयी नवजीवन देणाऱ्या व तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शिवनीबांध जलाशय आज उपेक्षीतांचे जीवन जगत आहे.

Shimanband reservoir deprived of tourist | शिवनीबांध जलाशय पर्यटनस्थळापासून वंचित

शिवनीबांध जलाशय पर्यटनस्थळापासून वंचित

Next

साकोली : शेतकऱ्यांना संकटसमयी नवजीवन देणाऱ्या व तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शिवनीबांध जलाशय आज उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. शासनाने या जलाशयाला पर्यटन यादीत समाविष्ठ करून सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी कुंभली जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य प्राचार्य होमराज कापगते यांनी केली आहे.
परिसरातील शेतीला संकटसमयी नवसंजीवनी देणाऱ्या या जलाशयाला निसर्गाचे अप्रतीम सौदर्य लाभलेले आहे. शासनाने १९६०-६१ मध्ये निर्माण केलेल्या या जलाशयाच्या उत्तर पुर्वभागात झाडे दक्षिणेस मोकळे मैदान, पश्चिमेस जलाशयाच्या लाभ क्षेत्रात येत असलेली परिसरातील शेतकऱ्यांची १ हजार ८३४ हेक्टर शेतजमीन आणि पुर्वेस पहाडी आहे. ९३२.०८ से.मी. सरासरी पर्जन्यमानाला तुडूंब भरणाऱ्या या जलाशयाचे पाणलोट क्षेत्र १९.४२ चौ.कि़ असून जलसंचय क्षमता ११.६३ द.ल. घ.मी. आहे. या जलाशयाच्या अप्रतीम सौदर्याच्या दर्शनासाठी रोज शेकडो पर्यटन भेटी घेतात. दोन उंच टेकड्यांना जोडणाऱ्या जलाशयाच्या भितीची लांबी ३०० मीटर असून उंची ८.८४ मीटर आहे. शासनाकृत मत्स्य बीज उत्पादन केंद्र व शासकीय रोपवाटीका आहे.
४.४८ हेक्टर जमिनीवर असलेल्या मत्स्य बीज उत्पादन केंद्रातील चायनीज वर्तुळाकार मत्स्यबीज प्रक्रिया बघण्यास पर्यटकांच्या गर्दीला शिवनीबांध जलाशय व रोपवाटीका केंद्रापासून वंचित राहत नाही. ११ हेक्टरमध्ये असलेल्या रोपवाटीका केंद्रात नानाविध प्रकारच्या झाडांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे विविध प्रकारचे झाडे येथे बघायला मिळतात. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन झाल्याने जिल्ह्यात असलेले पर्यटनस्थळ गोंदिया जिल्ह्यात गेले.

Web Title: Shimanband reservoir deprived of tourist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.