एस.चंद्रा महिला विद्यालयात शिवाजी जयंती साजरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:15+5:302021-02-23T04:45:15+5:30
कळंबे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या आईची इच्छा ...
कळंबे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याकरिता स्वराज्य स्थापन केले. त्याप्रमाणे आज विद्यार्थिनींनी सुद्धा आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने कार्य करावे. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पूजन व त्यांना आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा. कमलेश पाटील, डॉ. चंदा गावंडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद सरदार, प्रा. भावना खापर्डे, डॉ. ललीतकुमार ठाकूर, डॉ. अजय मुन, प्रा. स्वप्नील भगत, प्रा. दिक्षा बडोले, जयेश शहारे, अमर गोडसे, राहुल मेश्राम, निर्दो शहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रतिमा भांडारकर यांनी केले तर आभार सीमा मडावी यांनी मानले.