शिवरायांचे विचार सर्वसामान्य जनतेने अंगीकारावे (शिवाजी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:54 AM2021-02-21T04:54:13+5:302021-02-21T04:54:13+5:30
इंदोरा-बुजरुक : राजेशाहीतही लोकशाही जपणारे राजे व्यक्तिगत स्वार्थापेक्षा रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे व स्त्रियांचा सन्मान करणारे, कुशल संघटक, महापराक्रमी ...
इंदोरा-बुजरुक : राजेशाहीतही लोकशाही जपणारे राजे व्यक्तिगत स्वार्थापेक्षा रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे व स्त्रियांचा सन्मान करणारे, कुशल संघटक, महापराक्रमी योद्धा, आदर्शपुत्र, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कुशल संघटन निर्माण करून या देशाला एकता व समतेची शिकवण देऊन स्वराज्य निर्माण केले. त्या महामानवाचे विचार आजच्या घडीला प्रेरणा देणारे असून, सर्वांनी शिवरायांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे सचिव सुरेश बन्सोड यांनी केले.
तिरोडा येथील वाचनालयात आयोजित शिवाजी जयंती सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक लक्ष्मीकांत मेश्राम, पी. एस. मेश्राम, टी. एम. वैद्य, ॲड. दुर्वास रामटेके, पृथ्वीराज मेश्राम, एल. एम. मेश्राम, कृष्णा रामटेके, दीपक असाटी, वैशाली तिरपुडे, रंजित बन्सोड उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन टी. एम. वैद्य यांनी केले. आभार वैशाली तिरपुडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी वाचनालयातील कर्मचारी ग्रंथपाल वैशाली तिरपुडे, लिपिक रंजीत बन्सोड व वाहने यांनी सहकार्य केले.