भरधाव ट्रकच्या धडकेत

By Admin | Published: January 28, 2017 12:24 AM2017-01-28T00:24:58+5:302017-01-28T00:24:58+5:30

वडसा-कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील देऊळगाव शिवारात एका ट्रकने दुचाकीला

In the shock of the truck | भरधाव ट्रकच्या धडकेत

भरधाव ट्रकच्या धडकेत

googlenewsNext

दोन दुचाकीस्वार ठार
अर्जुनी मोरगाव : वडसा-कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील देऊळगाव शिवारात एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या भिषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी १० ते १०.३० दरम्यान घडली. मृतकाची नावे सुनील परदेशी तुलावी (१४) रा. गजेगाव (कोरची) व बानसिंग इतवारी कोरेटी (२२) रा.खसोडा (कोरची) अशी आहेत. चोवाराम सुखलुराम राऊत (२५) रा. वाको (कोटगूल) हा जखमी झाला आहे.
मृतक सुनील हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगावच्या दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिकतो. सुटीच्या दिवशी नातेवाईक विद्यार्थ्यांना भेटायला येतात. यावरुन बानसिंग व चोवाराम हे दुचाकी क्रमांक सीजी ०८, झेड ८०५९ ने गुरुवारी गोठणगावला आले. शाळेतील कार्यक्रम बघून त्यांनी मुक्काम केला. त्यांनी सुनीलला सोबत घेतले. तिघांनीही नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बघितले. त्यानंतरण एका नातेवाईकाची भेट घेण्यासाठी ते देवलगावला रवाना झाले. देवलगाव शिवारात ट्रक क्र. एमएच ४० वाय ३१३० चा चालक विनोद सुनील सिंग (३२) याने दुचाकीला जबर धडक दिली. भरधाव वेगात असलेला हा ट्रक सुनील व बानसिंग यांचे अंगावरुन गेला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. चोवारामला किरकोळ जखम झाली.
अपघात एवढा भीषण होता की मृतकाच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर पसरला. नवेगावबांध पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व जखमी झालेल्या चोवारामला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. नवेगावबांध पोलिसांनी ट्रक चालक विनोद विरुद्ध कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ भादंवि तसेच सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात मृतकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ठाणेदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंद्रपाल कोडापे तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

खराब रस्त्यांचे बळी
४हा अपघात म्हणजे खराब रस्त्यांचाच बळी असल्याचा आरोप जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केला आहे. राज्य मार्ग वडसा ते कोहमारादरम्यान दरवर्षी कामे केली जातात. पण ती उखडून जातात. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे वारंवार खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही काही फरक पडला नाही. खड्डेमय रस्त्यामुळेच हा अपघात झाला, असा आरोप तरोणे यांनी केला. कंत्राटदारावर कारवाईची मागणीही होत आहे.

Web Title: In the shock of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.