आक्षेपार्ह विधान करणाऱ्याविरुद्ध दंड थोपटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:28 AM2019-03-07T00:28:29+5:302019-03-07T00:28:53+5:30
प्रा.नामदेव जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिकेत कार्यरत शिक्षकांना संबोधून आक्षेपार्ह विधान केले. त्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली.प्रा.जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने स्थानिक पोलीस ठाण्यात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : प्रा.नामदेव जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिकेत कार्यरत शिक्षकांना संबोधून आक्षेपार्ह विधान केले. त्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली.प्रा.जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने स्थानिक पोलीस ठाण्यात केली आहे.
शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे कार्य प्राथमिक शिक्षक अविरत करीत आहेत. यामुळे शिक्षकांना समाजात गुरुचे स्थान प्राप्त झाले आहे. समाज घडणीत शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. प्रा.नामदेव जाधव यांनी १८ फेब्रुवारीला एका जाहीर कार्यक्रमात शिक्षकांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्यात शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.हेतुपुरस्सर शिक्षकांना समाजात बदनाम करण्याचे वक्तव्य प्रा. जाधव करीत आहेत. त्यांचे हे विधान स्थानिक स्वराज्य संस्थाचे शिक्षकांचा उपमर्द करणारे आहे. या घृणित व आक्षेपार्ह विधानामुळे शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक व कुचेष्टेचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या वक्तव्याविरुद्ध म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने दंड थोपटले असून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. शिष्टमंडळात विनोद बडोले , रमेश गहाणे, कैलास हांडगे, सिद्धार्थ खोब्रागडे, विठोबा रोकडे, जी.पी. रामटेके, सुरेश ब्राम्हणकर, उमेश क्षीरसागर, विनोद चव्हाण,श्रीकृष्ण कोरे, जे.एस. मेश्राम, जितेंद्र ठवकर, अरुण फाये, प्रशांत चव्हाण, आर.एस.जांभुळकर, होमराज बहेकार, पी.एन. जगझापे, घनशाम बोंद्रेकर यांचा समावेश होता.