शेतात जाण्यासाठी पांदण रस्ताच नाही; युवकाचे पाणी टंकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 03:20 PM2022-11-14T15:20:40+5:302022-11-14T15:40:26+5:30

आठ तासाचा अल्टिमेटम

'Sholay style' agitation of a young man of mundipar to demand Pandan road to go to farm | शेतात जाण्यासाठी पांदण रस्ताच नाही; युवकाचे पाणी टंकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

शेतात जाण्यासाठी पांदण रस्ताच नाही; युवकाचे पाणी टंकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

Next

दिलीप चव्हाण 

गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील मुंडीपार येथील युवक संदीप राजेंद्र सरजारे (वय २६) हा गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाणीटंकीवर चढलाय. शेतात जाणारा पांदण रस्ता तयार करून द्या, या मागणीला घेऊन त्याचे आंदोलन सुरू आहे.

गेल्या पाच वर्षापासून शेतकरी संदीप सरजारे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, रस्ता नसल्याने शेतीची कामे करावी कशी हा प्रश्न संदीपला गेल्या पाच वर्षापासून सतावत आहे. अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने आज (दि. १४) संदीप बारा वाजतादरम्यान गावातीलच पाणीटंकीवर चढला. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत टाकीखाली उतरणार नाही असा पवित्रा संदीप ने घेतला आहे. यातच आठ तासाचा अल्टिमेटम देत, न्याय न मिळाल्यास पाणी टाकीवरून उडी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

दरम्यान गोरेगावचे तहसीलदार श्री सचिन गोसावी पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक घटनास्थळी दाखल झाले आहेत. संदीपला टाकी खाली उतरण्याची विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंडीपार येथील सहा शेतकऱ्यांच्या विरोधात संदिपच्या वडीलाने जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल केली आहे. मात्र शेतात जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता न  मिळाल्याने आज सोमवारी संदिप न्यायासाठी पाणीटाकीवर चढून न्याय मागत आहे.

Web Title: 'Sholay style' agitation of a young man of mundipar to demand Pandan road to go to farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.