प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने रात्री 9 वाजता पर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यात होत असलेल्या अनलॉक अंतर्गत आता बहुतांश उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. अशात प्रतिबंधित ...

Shops outside the restricted area until 9 p.m. | प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने रात्री 9 वाजता पर्यंत

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने रात्री 9 वाजता पर्यंत

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश। अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात होत असलेल्या अनलॉक अंतर्गत आता बहुतांश उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. अशात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकानांना आता २ तास वाढवून देत परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच, आता या दुकानी सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू राहतील. याशिवाय अन्य उपक्रमांना अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांनी काढले आहे.
या आदेशानुसार, गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी राहील. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच कोचींग क्लासेस ३१ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन व दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहणार असून या शिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. शैक्षणिक संस्थेतील ५० टक्के क्षमतेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि संबंधित कामाकरिता एकाच वेळी उपस्थित राहण्याची परवानगी गुरूवारपासून (दि.१५) देण्यात आली आहे. मात्र आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागामार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षणास परवानगी देण्यात येणार असून हे उपक्रम गुरूवारपासून सुरू राहतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील केवळ संशोधन अभ्यासक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था ज्यांना प्रयोगशाळेतील प्रायोगिक कामांची आवश्यकता असेल त्यानुसार गुरूवारपासून सुरू ठेवण्याची परवानगी राहील. सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालयांना शारीरिक अंतर व स्वच्छतेचे निकष पाळून गुरूवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मनोरंजनाकरीता बाग व उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आठवडी तसेच गुरांचे बाजार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून शासनाने कोरोनासाठी निर्गमित केलेल्या सूचना-नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. जिल्ह्यात रेल्वेने आगमन झालेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल व शिक्के मारण्यात येईल. संबंधित प्रवाशांना कोविड-१९ संदर्भातील सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी कळविले आहे.

विवाह सोहळ्यांत ५० जणांना परवानगी
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता गर्दी टाळणे गरजेचे असल्याने विवाह सोहळे व वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमांकरिता आणि संबंधित कार्यक्रमांकरिता ५० पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही. तसेच अंत्यसंस्काराकरिता २० पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असू नये असे आदेशात नमूद आहे.

Web Title: Shops outside the restricted area until 9 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.