पाणी गरम करण्याच्या केटलीला शॉटसर्किट, युनाइटेड हॉस्पिटलमधील घटना

By कपिल केकत | Published: April 27, 2023 04:55 PM2023-04-27T16:55:15+5:302023-04-27T16:58:14+5:30

वेळीच नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला

Short circuit due to water heating kettle, flare of fire in United Hospital | पाणी गरम करण्याच्या केटलीला शॉटसर्किट, युनाइटेड हॉस्पिटलमधील घटना

पाणी गरम करण्याच्या केटलीला शॉटसर्किट, युनाइटेड हॉस्पिटलमधील घटना

googlenewsNext

गोंदिया : पाणी गरम करण्याच्या इलेक्ट्रिक केटलीला शॉटसर्किट होऊन आगीचा भडका उडाल्याची घटना शहरातील युनाइटेड हॉस्पिटलमध्ये बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजता दरम्यान घडली. वेळीच आग नियंत्रित करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

शहरातील युनाइटेड हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांच्या कक्षात लागून असलेल्या इलेक्ट्रिक केटलीत अचानकच शॉटसर्किट झाला. बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेत माजी नगरसेवक सुनील तिवारी यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन पथकाने लगेच हॉस्पिटल गाठले. मात्र, तोपर्यंत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनीच आग नियंत्रणात आणली होती व त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: Short circuit due to water heating kettle, flare of fire in United Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.