गरिबांनी झोपडीतच राहावे काय? निधीअभावी पक्क्या घराचे स्वप्न लटकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:05+5:302021-07-20T04:21:05+5:30
नरेश रहिले गोंदिया : गरिबांना हक्काचे घर म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यात ८२ हजार ३८२ घरकुल द्यायचे आहेत. या ...
नरेश रहिले
गोंदिया : गरिबांना हक्काचे घर म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यात ८२ हजार ३८२ घरकुल द्यायचे आहेत. या घरकुलांना १०७६ कोटींची गरज आहे. यापैकी सन २०१६ पासून शासनाने ८८३ कोटी ११ लाख पाच हजार रुपये घरकुलासाठी दिले आहेत. आता १९२ कोटी ८६ लाख रुपयांची गरज आहे. पावसाळा सुरू होऊनही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचे घर पूर्ण होऊ शकले नाही.
.............
किती लोकांना मिळाला पहिला हप्ता- ८१५२६
किती लोकांना मिळणे बाकी आहे दुसरा हप्ता- ७३०९
.............
प्रस्ताव मंजूर-८२३८२
२०१६- ५६३४
२०१७-१०३१२
२०१८-४५६९
२०१९-२२९४९
२०२०-३८९१८
..................
६८६२४- जणांना मिळाले राज्य शासनाचे तिसऱ्या टप्प्याचे अनुदान
७४२१७- जणांना मिळाले केंद्राचे दोन्ही टप्प्याचे अनुदान
राज्य शासनाचे थकले अनुदान- ७७ कोटी १४ लाख ४० हजार
केंद्र शासनाचे थकले अनुदान- ११५ कोटी ७१ लाख ६० हजार
.....................
प्रत्येक लाभार्थ्याला मिळते अनुदान
राज्य शासनाकडून- ५२ हजार
केंद्र शासनाकडून-७८ हजार
..................
मोफत रेती मिळेना; साहित्यही महाग
गोंदिया जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्हा प्रशासनाने घरकुलाचे बांधकाम करणाऱ्यांना दोन ब्रास रेती मोफत देण्याचे ठरविले होते; परंतु लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाली नाही. घरबांधकामासाठी लागणारे साहित्यही महागले आहे.
...............
कोट
निधी देण्यासाठी राज्याचे एकच खाते असते. केंद्र आणि राज्य सरकार मिळून घरकुल बांधकाम किती झाले, याची माहिती अपलोड केल्यावर त्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाची रक्कम टाकली जाते.
-डी.आर. हरिणखेडे
प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा
...................
लाभार्थी कोट
१) घरकुल बांधकामासाठी शासन चार टप्प्यात पैसे देत आहे; परंतु वेळीच बांधकामाची किस्त येत नसल्याने घर बांधण्यात अडचण येत आहे. पंचायत समितीमधील घरकुलाचे काम पाहणारे कर्मचारी लक्ष देत नाहीत.
- उत्तम पाथोडे, बोथली.
...
२) उसनवारीवर पैसे घेऊन घरकुलाचे बांधकाम केले. किस्त कधी येईल, याकडे आशेने पाहत आहे. वारंवार पंचायत समितीत गेल्यावरही तेथील घरकुलाचे काम पाहणारे कर्मचारी सहकार्य करीत नाहीत.
- अमृत गायधने, जवरी.