लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:28 PM2018-09-06T21:28:15+5:302018-09-06T21:29:30+5:30

येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश प्रभारी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले.

Show reasons for late employees | लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा

Next
ठळक मुद्देसभापतींची विभागांना आकस्मिक भेट : कर्मचाºयांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश प्रभारी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
विदर्भ एक्सप्रेस आल्याशिवाय जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होत नाही असे म्हटले जाते. मात्र आता काही कर्मचाऱ्यांनी विदर्भने येवून विदर्भनेच जाण्याचा जणू संकल्प केला असल्याने दुपारी ३ वाजतानंतरच बऱ्याच शासकीय कार्यालयात शुकशुकाट असतो. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागते.
या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुध्दा लक्ष नसल्याने कर्मचाऱ्यांचा अपडाऊनचा प्रवास नियमित सुरू आहे. बरेच कर्मचारी तर विदर्भ एक्सप्रेसने येतानाच आज विदर्भ ने परत जायचे की अहमदाबाद गाडीने परत जायचे याचे वेळापत्रक तयार करतात.
त्यामुळे हे कर्मचारी कार्यालयात किती तास काम करीत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. जिल्ह्यातील किती अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्सप्रेसने अपडाऊन करतात हे बघायचे असेल तर ही गाडी येण्याच्या वेळी गोंदिया रेल्वे स्थानकासमोर उभे राहिल्यास दिसून येईल.
यासर्व प्रकारामुळे नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचीच दखल सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी पंचायत समितीच्या विविध विभागाना अचानक भेट दिली.
या वेळी शिक्षण विभागात डी. एच. पटले, समाज कल्याण विभागात ए.जी.राठोड व कृषी विभागात डी.के. रामटेके, व्ही. डी. मरस्कोल्हे हे कर्मचारी अनुउपस्थित होते. तर कार्यालयाच्या हलचल रजिस्टरची तपासणी केली असता त्यात दौरा दाखविला होता. मात्र स्वाक्षरी केली नव्हती, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश टेंभरे यांनी दिले. तसेच प्रभारी खंडविकास अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले.
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सभापतींच्या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत रुषीपाल टेंभरे, पत्रकार दिलीप चव्हाण, डिलेश्वर पंधराम, पंचायत विभागाचे ब्राम्हणकर, शंकर पारधी उपस्थित होते.

Web Title: Show reasons for late employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.