संविधानाची ताकद भाजपाला दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:44 AM2018-05-27T00:44:38+5:302018-05-27T00:44:38+5:30

केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारने मागील चार वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेच मोठे विकास कामे केले नाही. उलट अनेक योजनांची नावे बदलविण्या पलिकडे त्यांना काहीच करता आले नाही. ऐवढेच नव्हे तर अनेक धोरणे व कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न या सरकारने केला.

 Show the strength of the Constitution to the BJP | संविधानाची ताकद भाजपाला दाखवा

संविधानाची ताकद भाजपाला दाखवा

Next
ठळक मुद्देवर्षाबेन पटेल : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारने मागील चार वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेच मोठे विकास कामे केले नाही. उलट अनेक योजनांची नावे बदलविण्या पलिकडे त्यांना काहीच करता आले नाही. ऐवढेच नव्हे तर अनेक धोरणे व कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न या सरकारने केला. हे सरकार जातीय वादाला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अशा सरकारला आता संविधानाची ताकद दाखवा, असे आवाहन वर्षा पटेल यांनी केले.
भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपा, पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी मंजुषा चंद्रिकापुरे, युवक राकाँचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य किशोर तरोणे, माहुरकुडा जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, प्रमोद लांजेवार, सुशीला हलमारे, काँग्रेसचे समन्वयक रत्नदीप दहिवले, करूणा नांदगावे, अनिता खोब्रागडे, पद्मा राठोड, लोकपाल गहाणे, श्रावण मेंढे, मनोहर शहारे, राकेश लंजे, राकेश जायस्वाल, सुरेश खोब्रागडे, नामदेव डोंगरवार, संग्रामे ेउपस्थित होते.
वर्षा पटेल म्हणाल्या, भंडारा गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिन विकास केवळ प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनातच शक्य आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण नको. गोरगरीबांवर अन्याय नको, हिच धोरणे आघाडी सरकारची होती. आता भाजप सरकार चुकीचे धोरणे लागू करुन सर्वांचे कंबरडे मोडत आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. एकीकडे उज्वला योजनेतंर्गत गॅस सिलिंडर उपलब्ध करुन देऊन दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करुन सरकारने नेमके काय साध्य केले हे समजण्या पलिकडे आहे. या सरकारच्या काळात सर्वच जण दुखी असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेला मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखविण्याची संधी मतदारांना मिळाली असल्याचे सांगितले.

Web Title:  Show the strength of the Constitution to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.