श्रावणबाळ संजय गांधी निराधार मानधनाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:54 AM2021-02-18T04:54:05+5:302021-02-18T04:54:05+5:30

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ ...

Shravanbal Sanjay Gandhi without baseless honorarium | श्रावणबाळ संजय गांधी निराधार मानधनाविनाच

श्रावणबाळ संजय गांधी निराधार मानधनाविनाच

Next

केशोरी : महाराष्ट्र शासनाने श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना यांसारख्या लोकहिताच्या योजना कार्यान्वित करून निराधारांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले आहे. परंतु गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधनाचे वाटप न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यांना इतर लोकांसमोर हात पसरून भीक मागण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांचे मानधन वितरणात कमालीची अनियमितता आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थ्यांना मानधन वितरण करण्यात आले नाही. लाभार्थी वारंवार स्थानिक बँकेतील शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांना मानधनाविषयी विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे मानधन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. निराधारांना आधार देण्यासाठी श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसेल तर त्या योजना कार्यान्वित करून काय उपयोग, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्याने आपला स्वाभिमान विसरून भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आहे. याकडे तहसीलदारांनी स्वत: लक्ष देऊन त्या लाभार्थ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून अडलेले मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Shravanbal Sanjay Gandhi without baseless honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.