सरस्वती व जीएमबी विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:03 AM2021-09-02T05:03:08+5:302021-09-02T05:03:08+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मंत्री होते. यावेळी जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वीणा नानोटी, सरस्वती विद्यानिकेतन ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मंत्री होते. यावेळी जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वीणा नानोटी, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास गहाणे, शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, मुकेश शेंडे, प्रा. टी.एस. बिसेन, प्रा. यादव बुरडे, संजय बंगळे उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते देवी सरस्वती व योगेश्वर श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यानंतर प्राचार्य अनिल मंत्री व विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. सांस्कृतिक प्रमुख विष्णू चाचेरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला व दहीहंडी याबाबत माहिती विशद केली. कोरोनामुळे यावर्षी जन्माष्टमी विद्यार्थ्यांच्या सहभागाशिवाय साजरी करावी लागत आहे. त्यामुळे बालगोपाल या आनंदापासून वंचित आहेत याची खंत वाटते. कोरोनाची परिस्थिती नसती तर आज मुलांच्या सहभागातून पंचामृतरूपी आनंद अनुभवता आला असता, आज मुले नाहीत म्हणून परमेश्वराच्या कृपेने मला दहीहंडी फोडण्याचे भाग्य लाभले, असे प्रतिपादन अनिल मंत्री यांनी केले. यावेळी जीएमबी विद्यालयाच्या शिक्षिका जीएमबी अश्विनी भावे, ज्योती झलके, वंदना शेंडे, धनश्री चाचेरे यांनी कृष्ण जन्माष्टमीवर आधारित गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विष्णू चाचेरे यांनी केले.