रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:12+5:302021-03-04T04:56:12+5:30

बाजारातील रस्ते मोकळे करा गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड ...

Shrubs on the road cause accidents | रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

Next

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.

वातावरणातील बदलामुळे भीती

अर्जुनी-मोरगाव : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

स्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.

मोफत रेतीसाठी लाभार्थ्यांची पायपीट

परसवाडा : पतंप्रधान घरकुल योजनेंतर्गत आता ५ ब्रास रेती मोफत देण्यास मंजुरी दिली आहे. तहसीलदारांमार्फत रेतीचे वितरण केले जात असल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लगात आहेत. तर कर्मचारी त्यांची टोलवाटोलवी करीत असल्याने आता लाभार्थ्यांना पाटपीट करावी लागत आहे.

कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली

पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत ९ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.

नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त

देवरी : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ

सौंदड : शेतकरी रासायनिक खाताचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांत वाढ झाली आहे.

कार्यालयातून तक्रारपेट्या गायब

गोंदिया : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.

खतांचा अतिवापर धोकादायक

गोंदिया : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत, परंतु अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता अन्न प्रशासन विभागाने यकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

केशोरी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी

केशोरी : या ठिकाणी सर्व विभागाची कार्यालय असून एकही राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्यामुळे येथील शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केशोरी येथे राष्ट्रीयीकृत बँक शाखेची स्थापना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे प्रशिक्षण

बिरसी-फाटा : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान पथदर्शी प्रकल्पांतर्गत ग्राम बेरडीपार (खु.) येथे रब्बी हंगामासाठी मृद आरोग्य पत्रिका शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी छबीलाल पंचम पटले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद कुंभरे, सरपंच सरिता राणे, ग्रामपंचायत सदस्य रमेश साठवणे, माधव शरणागत, रतन खोब्रागडे तसेच मार्गदर्शक म्हणून के.एन. मोहाडीकर, वाय.बी. बावणकर उपस्थित होते.

Web Title: Shrubs on the road cause accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.