गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 01:54 AM2016-04-07T01:54:56+5:302016-04-07T01:54:56+5:30
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलद्वारे गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवार (दि.८) दुपारी २ वाजता श्रीराम उत्सव नवरात्रीकडून शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
गोंदिया : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलद्वारे गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवार (दि.८) दुपारी २ वाजता श्रीराम उत्सव नवरात्रीकडून शहरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते हातात झंडे व गळ्यात भगवा दुपट्टा घेऊन जय श्रीरामचे नारे लावण्यात येतील.
सिव्हील लाईन्स येथील हनुमान मंदिरातून रॅली निघणार आहे. यानंतर तेथून जुने आरटीओ चौक, आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकीज चौक, बजरंग दल कार्यालय ते गोरेलाल चौक, पोलीस ठाणे चौक, डॉ. गाडेकर चौक, खोजा मशिद चौकातून नेहरू चौकात शोभायात्रेची सांगता होईल. यावेळी नेहरू चौकात शोभायात्रेसह भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येईल. तसेच नऊ दिवसपर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती व प्रसाद वितरण, सत्संग, रामायणपाठ, हनुमान चालिसा आदी धार्मिक अनुष्ठान करण्यात येईल, अशी माहिती विदर्भ प्रांत संयोजक देवेश मिश्रा, नवीन जैन व महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री मनोज मेंढे यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी विहिंपचे जिल्हा अध्यक्ष भिकम शर्मा, उपाध्यक्ष मुन्ना लिल्हारे, योगराज रहांगडाले, मनोज मेंढे आदी सहकार्य करीत आहेत.