जिल्ह्याच्या विकासात समन्वय समितीचे मोलाचे योगदान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:51+5:302021-08-29T04:28:51+5:30

गोंदिया : दुसऱ्या जिल्ह्यातून जेव्हा कोणताही अधिकारी-कर्मचारी येतो तेव्हा त्यांच्याकरिता नवीन कार्यक्षेत्र असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला ...

Significant contribution of Coordinating Committee in the development of the district () | जिल्ह्याच्या विकासात समन्वय समितीचे मोलाचे योगदान ()

जिल्ह्याच्या विकासात समन्वय समितीचे मोलाचे योगदान ()

googlenewsNext

गोंदिया : दुसऱ्या जिल्ह्यातून जेव्हा कोणताही अधिकारी-कर्मचारी येतो तेव्हा त्यांच्याकरिता नवीन कार्यक्षेत्र असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला सर्वांविषयी अभ्यासाकरिता वेळ लागतो. पण अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून नवीन अधिकाऱ्याला खूप कमी वेळात जिल्हा आपलासा वाटू लागतो. त्यामुळे अधिकाऱ्याला नवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळते. जिल्ह्याच्या विकासात समन्वय समितीचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.

येथील अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वागत व निरोप समारंभात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपवन संरक्षक कुलराजसिंग, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, डॉ. राजेंद्र जैन, जिल्हा जलसंधारण अधिकारी (भंडारा) सुभाष कापगते, अश्विन ठक्कर, कमलेश सोनाळे, संजय कटरे, अनिल देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, डी. यू. राहांगडाले उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी गुंडे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय अभियंता संजय कटरे, संशोधन सहाय्यक तुळशीदास झंझाड यांच्या समितीच्या वतीने जिल्ह्यात स्वागत करण्यात आले, तर उपजिल्हाधिकारी शिल्पा सोनाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांचे स्थानांतरण झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. संचालन डॉ. अजय बिरनवार यांनी केले. आभार लीलाधर पाथोडे यांनी मानले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यपालन अधिकारी नरेश भांडारकर, महिला बालविकास अधिकारी संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, गोंदिया सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक प्रशांत तुरकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी सुनील फुके, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ. मंगेश वानखेडे, महावितरणचे योगेश सोनुले, परिवहन विभागाचे प्रशांत मंडवेकर व अनेक अधिकारी उपस्थित होते.

----

कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार

याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. दीपक बाहेकर, कार्तिक चव्हाण, मंकड अग्रवाल तर आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. रवि धकाते यांचा जीवनगौरव पुरस्काराने, कोरोनायोद्धा म्हणून डॉ. डी. बी. जयस्वाल तर युवारत्न पुरस्कारांचे प्रमोद गुडधे यांचा तर लेखापरीक्षक जलसंधारण विभाग तथा अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुद्धे यांचा सेवानिवृत्ती सत्कारासह समाजरत्न पुरस्काराने जिल्हाधिकारी गुंडे व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या उपविभागीय अभियंता वाय. एच. चौधरी, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष कापगते यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Significant contribution of Coordinating Committee in the development of the district ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.