राजकारण व देश विकासात उत्तर भारतीयांचे महत्त्वपूर्ण योगदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:01+5:302021-09-27T04:31:01+5:30
गोंदिया : उत्तर प्रदेश भारतात विकास नीती व राजकारणाची दिशा ठरविणारे महत्त्वपूर्ण राज्य आहे. उत्तर भारतीयांना देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून ...
गोंदिया : उत्तर प्रदेश भारतात विकास नीती व राजकारणाची दिशा ठरविणारे महत्त्वपूर्ण राज्य आहे. उत्तर भारतीयांना देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून आपली विशिष्ट ओळख निर्माण करून उत्तर भारतीय संस्कृतीचा राष्ट्रव्यापी प्रसार केला आहे. राजकारण व देश विकासात उत्तर भारतीयांचे महत्त्वपूर्ण असून आता त्यांनी भाजपशी जुळून नरेंद्र मोदींच्या हाताला अधिक मजबूत करावे असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे संस्थापक पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्तर भारतीय मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव गोपाल गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. गुप्ता यांनी, उत्तर भारतीयांचा नेहमीच भाजपकडे कल राहिला असून भाजप उत्तर भारतीयांच्या हितांच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असल्याचे मत व्यक्त केले. बैठकीला उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित झा, नगरसेवक सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, दिलीप गोपलानी, जयंत शुक्ला, व्यंकट पाथरू, अरुण दुबे, अभय सावंत, शंभूशरण ठाकूर, ताजेंद्रसिंग छाबडा, संदीप ठाकूर, दीपक अग्रवाल, नितेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.