जिल्ह्यात कोरोना उद्रेकाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:26 AM2021-03-22T04:26:39+5:302021-03-22T04:26:39+5:30
गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ सुरु होती. मात्र रविवारी (दि.२१) एकाच दिवशी ९२ कोरोना ...
गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ सुरु होती. मात्र रविवारी (दि.२१) एकाच दिवशी ९२ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा कोरोना संसर्गात वाढ होत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहे. मात्र आता जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधितांची संख्या दिवसंदिवेस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुध्दा कोरोनाल प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक स्वरुपात राबविण्याची गरज आहे. रविवारी जिल्ह्यात आढळलेल्या ९२ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ३८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव ६, अर्जुनी ५, सडक अर्जुनी १, तिरोडा १७, गोरेगाव ३ आणि देवरी तालुक्यातील २१ कोरोना बाधितांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ९५३०३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८२०६२ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ८०५९६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७४२०७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५०८७ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ... मात केली आहे. तर १०३३ स्वब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.....
आतापर्यंत १५ हजार बाधितांची नोंद
जिल्ह्यात २७ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गाला सुरुवात झाल्याला आता वर्षभराचा कालावधीत पूर्ण होत असून २१ मार्चपर्यंत १५ हजार ८७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १४ हजार ५०० जणांनी कोरोनावर मात केली.
..........
कोरोना बाधितांचा पाॅझिटिव्हीटी रेट ८.७८ टक्के
जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून कोरोना बाधितांचा आकडा आता १५ हजार पार झाला आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजन टेस्टचा कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट ८.७८ टक्के आहे.