साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:00 AM2021-04-05T05:00:00+5:302021-04-05T05:00:20+5:30

कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही.

Sir, let's die from PPE insects, not corona! | साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू!

साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू!

Next
ठळक मुद्देवाढत्या तापमानामुळे समस्या : पण सेवेत खंड नाही

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. मात्र, या कीटचा अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अशातच तापमानाचा पारा वाढल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना कोरोना नव्हे, तर पीपीई कीटच जीवघेणी ठरत आहे. पण डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी याची तक्रार न करता रुग्णांना अखंडितपणे सेवा देत आहे. 
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही. पण याची कुठलीही तक्रार न करता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपलीे सेवा नियमितपणे देत आहे. 
 

आरोग्य कर्मचारी त्रस्त

 कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक तास उभे राहावे लागते. सुरक्षेसाठी पीपीई कीट परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र, या कीटमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, कारण या कीटमधून हवा अजिबात शरीरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सलग एकाच कर्मचाऱ्यांकडे हे काम न देता टप्प्याटप्प्याने देण्यात यावे.
 शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
 पीपीई कीट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हातापायाला व्रण येणे, चक्कर येणे, युरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा, आदी समस्यांना समोरे जावे लागत आहे. 
 

पीपीई कीट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा पारा वाढल्याने या समस्यांमध्ये वाढ झाली असली, तरी वैद्यकीय कर्मचारी रुग्ण सेवेला प्राधान्य देत आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्ण सेवेला प्राधान्य देत आहेत. 
- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया. 

 

Web Title: Sir, let's die from PPE insects, not corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.