‘पलास’मध्ये बचत गटाच्या महिलांचे हाल

By admin | Published: March 30, 2017 12:59 AM2017-03-30T00:59:53+5:302017-03-30T00:59:53+5:30

गोंदिया शहरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना ....

The situation of the women of the savings group in 'Palas' | ‘पलास’मध्ये बचत गटाच्या महिलांचे हाल

‘पलास’मध्ये बचत गटाच्या महिलांचे हाल

Next

मार्केटिंगअभावी विक्रीच नाही : तोकडी रोजी, गैरसोयींमुळे महिलांची कुचंबना
गोंदिया : गोंदिया शहरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे मार्केटिंग व्हावे म्हणून दरवर्षी ‘पलास’ नावाने प्रदर्शन भरविले जाते. यावर्षीही सोमवार दि.२७ ला हे प्रदर्शन सुरू झाले. पण गोंदियातील नागरिक ना हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहे, ना वस्तूंच्या खरेदीसाठी. मुळात असे प्रदर्शन गोंदियात लागले आहे, याची माहितीच कोणाला नसल्यामुळे यात सहभागी झालेल्या महिला बचत गटांसाठी ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ अशी स्थिती झाली आहे.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत या प्रदर्शनच्या आयोजनााठी आणि मार्केटिंगसह सहभागी महिला बचत गटांच्या सोयीसुविधांसाठी लाखो रुपये मंजूर आहेत. मात्र डीआरडीएचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी विजय जवंजाळ यांनी हा निधी खर्च करताना चांगलाच हात आखडता घेतला आहे. प्रदर्शनाची जाहीरातबाजी करणे तर दूरच, आपल्या वतीने साधी बातमीसुद्धा तयार करून पाठविली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकच काय पण पत्रकारसुद्धा गोंदियातील या प्रदर्शनापासून अनभिज्ञ होते.
‘लोकमत’ने बुधवारी या प्रदर्शनात स्टॉल लावणाऱ्या जिल्ह्यातील अनेक भागातून आलेल्या महिला बचत गटाच्या सदस्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी आपली व्यथा पोटतिडकीने मांडली.
तीन दिवसात अनेक स्टॉलमध्ये ५०० रुपयांच्याही साहित्याची विक्री झाली नाही. हे प्रदर्शन पाहण्यासाठीही कोणी येत नाही, अशी खंत या महिलांनी व्यक्त केली. या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

महिलांची गैरसोय आणि कुचंबना
विशेष म्हणजे या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व महिला जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या आहेत. एका स्टॉलवर दोन महिला याप्रमाणे शंभरावर महिला चार ते पाच दिवस मुक्कामी राहणार आहेत. मात्र त्यांना केवळ निवासाची सोय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून केली आहे. पण शौचालयाचीही सोय नाही, मुत्रीघर अस्थायी स्वरूपाचे पडद्याचे आहे. या महिला प्रतिमहिला केवळ १५० रुपये रोजी दिली जात आहे. त्यात दिवसभर चहापाणी-जेवण करायचे आहे. याउलट चंद्रपूरमध्ये महिलांना २५० रुपये रोजी आणि जेवण व चहापाण्याचीही सोय सरकारी यंत्रणेने केली होती, असे सांगत बचत गटाच्या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पालकमंत्र्यांची नाराजी,
तरीही अधिकारी उदासीन
या प्रदर्शनात विविध कलात्मक वस्तूंपासून तर रानमेवा, विविध गृहोपयोगी पदार्थ, धान्यापर्यंत बऱ्याच गोष्टींचे ८० स्टॉल लागले आहेत. पण एवढ्या चांगल्या वस्तू असताना लोकांना त्याची माहिती करून देण्यासाठी डीआरडीएने कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही, याबद्दल प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आलेले पालकमंत्री राजकुमार बडोले यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. तरीही दोन दिवस अधिकाऱ्यांनीही कोणतीही दखल घेतली नाही. आता उरलेल्या दोन दिवसात (दि.३० व ३१) काय सोय करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
 

Web Title: The situation of the women of the savings group in 'Palas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.