सहा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:57+5:302021-09-08T04:34:57+5:30

इसापूर : अर्जुनी-मोरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोरील इमारतीच्या छतावर सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. ...

Six gamblers were caught red-handed | सहा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले

सहा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले

Next

इसापूर : अर्जुनी-मोरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोरील इमारतीच्या छतावर सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्या नेतृत्वात अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी रविवारी (दि. ५) रात्री २ वाजता ही कारवाई केली. यात पोलिसांनी घटनास्थळावरून तीन लाख ९९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला रविवारी (दि. ५) रात्री शहरातील वन विभागाच्या कार्यालयासमोरील एका इमारतीच्या छतावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक उघडे यांच्या नेतृत्वात अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी जुगारावर धाड मारून तेथे ५२ ताशपत्तीवर पैशांच्या हार-जीतचा खेळ खेळत असताना अर्जुनी-मोरगाव येथील रहिवासी आरोपी प्रजेश अशोक कोरे (२७), मंगेश मारुती हरने (३४), राकेश आत्माराम डोंगरवार (३५), लोकेश उमेश क्षीरसागर (२६), बोंडगावदेवी येथील रहिवासी विश्राम शंकर रामटेके (४२) व विकास रामप्रसाद बरैया (३६) यांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी आरोपींची झडती घेऊन ५० रुपये किमतीचे ताशपत्ते, आठ हजार रुपये रोख, चार मोटारसायकल व पाच मोबाइल असा एकूण तीन लाख ९९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात रमेश सेलोकर व मडावी करीत आहेत.

Web Title: Six gamblers were caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.