चेक बाऊन्सप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 12:09 AM2017-02-05T00:09:51+5:302017-02-05T00:09:51+5:30

बी.सी.खेडवन बीसीची रक्कम ग्राहकांना परत न करता धनादेश देऊन धनादेश बाऊन्स प्रकरणी देवरी निवासी

Six-month imprisonment for check-bounce case | चेक बाऊन्सप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

चेक बाऊन्सप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

Next

३.४० लाख जमा करा : देवरी न्यायालयाचा आदेश
देवरी : बी.सी.खेडवन बीसीची रक्कम ग्राहकांना परत न करता धनादेश देऊन धनादेश बाऊन्स प्रकरणी देवरी निवासी अनिल नारायण मोहबीया याला प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी देवरी यांनी धनादेश अनादरणाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात सहा-सहा महिन्याच्या कारावासाची श्क्षिा सुनावली सुनावली. तसेच आरोपीला दोन्ही प्रकरणातील एकूण ३ लक्ष ४० हजार रुपये जमा करण्याचे आदेृ सिले. ही रक्कम जर आरोपींनी जमा केली नाही तर अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा शुूक्रवारला सुनाविण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार प्रवीण दहीकरला आरोपीकडून १ लक्ष ८० हजार व वसीम खान यांना १ लक्ष ६० हजार रुपये घेणे होते. आरोपीने या दोघांना तेवढ्या रक्कमेचा धनादेश दिला होता. धनादेश बँकेत टाकले असता रक्कम नसल्याने धनादेशाचे अनादरण झाले. धानादेश अनादरण प्रकरणाची केस दोन्ही फिर्यादीने देवरीच्या कोर्टात टाकलली. दोन्ही फिर्यादीचे वकील अ‍ॅड. भुषण मस्करे यांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडली तर आरोपीकडून अ‍ॅड. प्रशांत संगीडवार व आशा भाजीपाले यांनी बाजू मांडले. शेवटी दोन्ही केस नं.१५६/२०२२ व केस नं.९१/२२१२ मध्ये आज न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी एस.ए.इंगळे यांनी आरोपी अनील नारायण मोहबीया याला दोन वेगवेगळ्या प्रकरणात सहा-सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा व दोन्ही फिर्यादीचे एकूण ३ लक्ष ४० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six-month imprisonment for check-bounce case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.