मेडिकलमध्ये सुरु होणार सहा पीजीचे अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:21 PM2019-05-31T22:21:07+5:302019-05-31T22:21:46+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. यानंतर आता मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने नुकतीच या महाविद्यालयातील एमबीबीएस चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. तसेच सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सुध्दा मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. यानंतर आता मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने नुकतीच या महाविद्यालयातील एमबीबीएस चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. तसेच सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सुध्दा मंजुरी दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वरुपात वैद्यकीय महाविद्यालयाला तज्ज्ञ डॉक्टर सुध्दा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी आनंदाची आहे.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पदव्युत्तर सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एमसीआयची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे हे अभ्यासक्रम येथे सुरू झाले नव्हते. मात्र एमसीआयने एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने १४ मे रोजी कॉलेज आॅफ फिजीशीयन व सर्जन बॉम्बे परळ मुंबई या संस्थेचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने मंजुरी दिली आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषद अथवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान, नाक, घसारोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ आणि अस्थीरोग तज्ज्ञ विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.यासाठी प्रवेशाची क्षमता सुध्दा वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने निश्चित करुन दिली आहे. यामुळे हा अभ्यासक्रमासाठी बाहेरुन डॉक्टर येतील.
शिक्षणासह ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सेवा सुध्दा देतील त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बरेचदा तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूर येथे रेफर केले जाते. अथवा रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. मात्र आता ही अडचण पूर्णपणे दूर झाली आहे.त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासा दायक आहे.
याच सत्रापासून प्रवेश
एमसीआय आणि शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्याला १४ मे रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच शैक्षणिक सत्रापासून सुरू केला जाणार आहे.
एमसीआय आणि शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने वैद्यकीय महाविद्यालयात सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे महाविद्यालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळणार असून त्याची रुग्णांना सुध्दा मदत होईल.
- व्ही.पी.रुखमोडे
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.