उन्हाळी सुट्ट्यांसाठी धावणार सहा ‘समर स्पेशल’ ट्रेन

By admin | Published: June 9, 2017 01:25 AM2017-06-09T01:25:53+5:302017-06-09T01:25:53+5:30

उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवासी सुविधांना लक्षात घेवून

Six 'Summer Special' trains to be run for summer holidays | उन्हाळी सुट्ट्यांसाठी धावणार सहा ‘समर स्पेशल’ ट्रेन

उन्हाळी सुट्ट्यांसाठी धावणार सहा ‘समर स्पेशल’ ट्रेन

Next

अतिरिक्त गर्दी होणार कमी : दपूम रेल्वेची प्रवासी सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवासी सुविधांना लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे सहा स्पेशल गाड्यांची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सदर माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.
यात कामाख्या-पुणे-कामाख्या साप्ताहिक सुविधा स्पेशल ट्रेन कामाख्यावरून पुणेसाठी १२ ते २६ जूनपर्यंत एकूण तीन फेऱ्यांसाठी चालविण्यात येणार आहे. तर पुणे ते कामाख्यासाठी ८ ते २९ जूनपर्यंत एकूण चार फेऱ्यांसाठी चालविण्यात येणार आहे. ही गाडी कामाख्या ते पुणेसाठी (८२५०६) या क्रमांकासह दर सोमवारी कामाख्यावरून रात्री ११ वाजता रवाना होईल व पुणे येथे प्रत्येक गुरूवारी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. तसेच पुणेवरुन कामाख्यासाठी (८२५०५) या क्रमांकासह प्रत्येक गुरूवारी सकाळी १०.३० वाजता रवाना होईल व कामख्या येथे प्रत्येक शनिवारी दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल.
सियालदाह-लोकमान्य तिलक-सियालदाह साप्ताहिक सुपरफास्ट एसी समर स्पेशल ट्रेन प्रत्येक रविवारी सियालदाहवरून लोकमान्य तिलकसाठी ११ ते २५ जूनपर्यंत (०२२५५) या क्रमांकासह तसेच प्रत्येक मंगळवारी लोकमान्य तिलक ते सियालदाहसाठी १३ ते २७ जूनपर्यंत (०२२५६) या क्रमांकासह धावेल. या स्पेशल ट्रेनमध्ये एसी-२ चे चार कोच, एसी-३ चे ९ कोच व दोन पॉवरकारसह एकूण १५ कोच राहतील.
सोमनाथ-पुरी-सोमनाथ ही समर स्पेशल ट्रेन सोमनाथ व पुरी दरम्यान साप्ताहिक स्पेशल ट्रेन आठ फेऱ्यांसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गाडी प्रत्येक शनिवारी सोमनाथवरून पुरीसाठी १० जून ते १ जुलैपर्यंत (०९२०८) या क्रमांकासह धावेल.
तसेच याच प्रकारे विरूद्ध दिशेतसुद्धा प्रत्येक बुधवारी पुरी ते सोमनाथसाठी ७ जून ते ५ जुलैपर्यंत (०९२०८) या क्रमांकासह चालेल. या स्पेशल ट्रेनमध्ये एसी-२ चा एक कोच, एसी-३ चे दोन कोच, स्लिपरचे ८ कोच, सामान्य ४ व एसएलआरडीच्या दोन कोचसह एकूण १७ कोच राहतील.
बिलासपूर-पुणे-बिलासपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडी बिलासपूर-पुणे-बिलासपूर दरम्यान चालवण्यात येत आहे. ही गाडी बिलासपूरवरून ७ ते २८ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी (०२०४४) क्रमांकासह तथा पुणेवरून १३ ते २७ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी (०२०४३) या क्रमांकासह धावेल.
संतरागाछी-राजकोट-संतरागाछी दरम्यान समर स्पेशल ट्रेन सांतरागाछीवरून (०२८३४) या क्रमांकासह प्रत्येक शुक्रवारी ९ ते ३० जूनपर्यंत राजकोटसाठी धावेल. तसेच विरूद्ध दिशेत राजकोटवरून ही गाडी (०२८३३) या क्रमांकासह प्रत्येक रविवारी ११ जून ते २ जुलैपर्यंत सांतरागाछीसाठी चालेल. या गाडीत दोन जनरेटर कार व १४ एसी-३ कोचसह एकूण १६ कोच राहतील.
संतरागाछी-पुणे-संतरागाछी दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालेल. ही साप्ताहिक एसी सुपरफास्ट गाडी आहे. ही गाडी सांतरागाछीवरून प्रत्येक शनिवारी (०२८२२) क्रमांकासह १० ते २४ जूनपर्यंत चालेल.
पुणेवरून प्रत्येक सोमवारी (०२८२१) क्रमांकासह १२ ते २६ जूनपर्यंत चालेल. या एसी स्पेशल ट्रेनमध्ये तीन एसी-२, आठ एसी-३ सह एकूण ११ कोच राहतील.

Web Title: Six 'Summer Special' trains to be run for summer holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.