सहा गेले आणि दोनच आले

By Admin | Published: June 7, 2017 12:12 AM2017-06-07T00:12:38+5:302017-06-07T00:12:38+5:30

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अगोदरच अव्यवस्थित असलेल्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण

Six went and the two came | सहा गेले आणि दोनच आले

सहा गेले आणि दोनच आले

googlenewsNext


कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण : पालिकेचा कारभार विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अगोदरच अव्यवस्थित असलेल्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण त्यात आता अधीकची भर घालत आहे. पालिकेतील महत्वपूर्ण विभागातील सहा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले आहे. तर त्यांच्या जागी फक्त दोनच कर्मचारी आले आहेत. सहा गेले आणि दोनच परत आल्याने पालिकेतील कारभार विस्कळीत झाला असून दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम पडत आहे.

अजब-गजब कारभासाठी नगर परिषद तशीही ओळखली जाते. त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पालिकेचा कारभारही व्यवस्थित नाही. परिणामी कित्येक कामे करावयाची असतानाही कर्मचाऱ्यांअभावी ती कामे करता येत नाहीत. याचा फटका सुद्धा पालिकेला सहन करावा लागतो हे सुद्धा दिसून येते. तरिही पालिकेचे कामकाज कसेबसे एकाच्या खांद्यावर दुसऱ्याची जबाबदारी टाकून कसे तरी उरकण्याची प्रथा सुरू होती. यात उशीरा का होईना काही तर होत आहे याचा दिलासा पालिका प्रशासनाला होता.

असे होत असतानाच मात्र पालिकेत कार्यरत राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. हे स्थानांतरण सुध्दा तडफाफडकी स्वरूपाचे होते व कर्मचाऱ्यांना त्वरीत नव्या जागी रूजू होण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. त्यामुळे स्थानांतरण झालेले सहा कर्मचारी आदेशानुसार आपापल्या ठिकाणी रुजू झाले. सहा कर्मचारी येथून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त पडून होत्या त्याचा परिणाम ते बघत असलेल्या कामकाजावर पडत आहे. असे असताना मात्र सहा कर्मचाऱ्यांच्या जागांवर फक्त दोनच कर्मचारी पालिकेत रूजू झाले आहेत.

सहा गेले आणि दोनच आले अशी स्थिती पालिकेत आहे. विशेष म्हणजे स्थानांतरण झालेल्या या कर्मचाऱ्यांमुळे ते निगडीत असलेल्या विभागाचा कारभारच विस्कटला आहे. अशात त्याचा परिणाम नगर पालिकेच्या कामकाजावरही पडणार आहे. त्यामुळे आता रिक्त पडून असलेल्या त्यांच्या जागांवर नवे कर्मचारी आल्यावरच कारभार सुरळीत होण्याचे म्हणता येईल. मात्र या कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणामुळे पालिकेतील मॅकेनिक, प्रधानमंत्री आवास, कोर्ट, विद्युत, बांधकाम यासह अन्य काही विभागांचा कारभार विस्कळीत झाला आहे.



बांधकाम विभाग वाऱ्यावर

नगर पालिकेतील बांधक ाम विभागाचा तसाही कुणी वाली नव्हता. त्यात आता कावडे व कोरडे यांचे स्थानांतरण झाल्याने विभागात कार्यरत तीन कंत्राटी अभियंत्यांच्या भरवशावर विभागाचा कारभार आला आहे. कारण, नगर परिषद अभियंत्याचा प्रभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बारई यांच्याकडे आहे. त्यात कावडे व कोरडे कसे तरी कारभार चालवित होते. आता मात्र त्यांचेही स्थानांतरण झाल्याने विभागात कंत्राटी अभियंता सोडून अन्य कुणीच उरले नाहीत. विशेष म्हणजे कोर्ट एजंट म्हणून काम बघत असलेले लिमये यांचेही स्थानांतरण झाल्याने आता कोर्टाचे प्रकरण बघायला कुणीही नाही. कोर्टाचे कामकाज सांभाळणे साधारण काम नसल्याने आता कुणाकडे हे काम द्यावे असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

 

Web Title: Six went and the two came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.